देवगड पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘देवगड रन’चे आयोजन
देवगड :
रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी, देवगड आणि डॉक्टर फॅटर्निटी क्लब, देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने देवगडच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी “दौड आरोग्याची, साद देवगडच्या पर्यटनाची” या घोषवाक्यासह रविवार, 29 डिसेंबर 2024 रोजी “देवगड रन” या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेबाबत सविस्तर माहिती रोटरी क्लब ऑफ मँगो सिटीचे सचिव गौरव पारकर आणि अनिल गांधी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
स्पर्धेसाठी 5 किमी आणि 10 किमी असे दोन गट ठेवण्यात आले आहेत. ही स्पर्धा डायमंड हॉटेल येथून सुरू होईल व तारामुंबरी बीच येथून परत डायमंड हॉटेल येथे संपेल.
सहभागी होऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी 22 डिसेंबर 2024 पर्यंत ऑनलाईन फॉर्म भरावा. लिंक आयोजकांतर्फे उपलब्ध करून देण्यात आली आहे.