पेन्शनर्स डे चे 17 डिसेंबर रोजी आयोजन
सिंधुदुर्गनगरी
पेन्शनर्स डे चे औचित्य साधून निवृत्तीवेतनधारकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या माध्यमातून राज्यशासकीय निवृत्तीवेतनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक यांच्या समस्यांचे निराकारण करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम जिल्हा कोषागार कार्यालयाच्या सभागृहात सकाळी 11 ते 2 यावेळात आयोजित करण्यात आला असून सर्व निवृत्तीवेतनधारक यांनी लाभ घेण्याचे आवाहन अप्पर कोषागार अधिकारी (निवृत्तीवेतन) संजय गोविंद घोगळे यांनी केले आहे.
पेन्शनर्स डे चे औचित्य साधून जिल्हा कोषागार कार्यालय, सिंधुदुर्ग येथे मंगळवार दिनांक 17 डिसेंबर रोजी निवृत्तीनंतरची गुंतवणूक या विषयावर मार्गदर्शन (वक्ते श्री. गौकरण गुप्ता, विभागीय प्रमुख, एचडीएफसी पेन्शन सोल्युशन्स) काव्यरंग (निवृत्तीवेतनधारकांनी सादर केलेले काव्यवाचन), निवृत्तीवेतनधारकांचे मनोगत इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच प्रमुख वक्ते श्री.अमित के. मेश्राम, जिल्हा कोषागार कार्यालय, सिंधुदुर्ग हे “कोषागार आणि निवृत्तीवेतनधारक ऋणानुबंध” याविषयाच्या माध्यमातून निवृत्तीवेतनधारक यांच्याशी संवाद साधणार आहेत.