You are currently viewing जिल्हास्तरीय युवा महोत्सवात ‘लोकगीत, स्पर्धेत स्वराज गृप प्रथम 

जिल्हास्तरीय युवा महोत्सवात ‘लोकगीत, स्पर्धेत स्वराज गृप प्रथम 

जिल्हास्तरीय युवा महोत्सवात ‘लोकगीत, स्पर्धेत स्वराज गृप प्रथम

बुलढाणा

क्रीडा व युवक सेवा संचालनालयां अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व नेहरू युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने तथा एन एस एस विभागाच्या जिल्हा क्रीडा संकुल येथे जिल्हास्तरीय युवा महोत्सव आयोजित करण्यात आला . त्यात बुलडाणा येथिल स्वराज् कला अॅकडमी चा मुलींचा चमू ‘ लोकगीत गायन स्पर्धेत जिल्हा स्तरावर .,प्रथम, क्रमांकाने विजयी झाला .
विजयसिंह राठोड यांचा स्वराज ग्रृप बुलढाणा यांनी जिल्हास्तरीय महोत्सवात विभाग स्तरांवर सहभाग नोंदविला . त्यात वादक – प्रणव डोंगरदिवे, हरिओम गावंडे, श्रीराम गावंडे, तसेच लोकगीत गायिका, कु. स्नेहल पवार, वंशिता तायडे, आरती घोडके, कुमुद पवार, दुर्वाताई म्हस्के, योगिता पवार, वादक, श्रीराम गावंडे, आणि शिवचरण वरपे यांनी सहभाग नोंदविला . रोख रक्कम आणि प्रशस्ती सहभाग पत्र आणि मेमेंटो देवून ग्रृपला उपस्थित मान्यवर व परिक्षक यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले .यावेळी या महोत्सवात वकृत्व, लोकगीत, कथा लेखन, चित्रकला, लोकनृत्य, आदी कला प्रकार व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी जिल्हा क्रिडा अधिकारी बी एस . महानकर,जिल्हा नियोजन अधिकारी राहूल पवार, प्रा . डॉ. गोविंद गायकी, नेहरू युवा केंद्राचे अजय सिंह राजपूत आदी उपस्थित होते .सदर गायनासाठी व यशस्वीतेसाठी अजयसिंह राठोड, जय राठोड,विजयसिंह राठोड, शाहीर मनोहर पवार यांनी मार्गदर्शन केले .

प्रतिक्रिया व्यक्त करा