You are currently viewing माहेर

माहेर

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*माहेर*

 

पांधी धरूनिया थेट

जाते माहेरची वाट

वाहे झुळझुळ पाणी

वावराच्या मध्ये पाट

 

दिसभर शेतामध्ये

राबते माझी माऊली

आंबा, चिंचाच्या झाडांची

न्याहारीस् मिळे साऊली

 

माहेरच्या घरी जाता

निघे शीन सासरचा

भाऊराया पुसतो

हाकहवाल भाऊजीचा

 

बांधावर दोन्ही बाजु

पहुडलं वेली रानं

मातीत माहेरच्या

दिसे कुबराचं धनं

 

माहेरच्या अंगणात

नांदे तुळस माऊली

आई बाबांची असे

भाऊरायावर साऊली

 

आंबा फणसाची झाडे

आजोबांनी लावलेली

फळे चाखाया मिळती

नातंवंडासी पिकलेली

 

माझ्या माहेराची आठव

मला रोजचं येते

डोळे बंद करीता

मुर्ती माऊली दिसते .

 

शीला पाटील. नशिक.

प्रतिक्रिया व्यक्त करा