You are currently viewing अवैध वाळू उत्खननावर कारवाई न झाल्यास खाडीपात्रात उतरून आंदोलन करणार

अवैध वाळू उत्खननावर कारवाई न झाल्यास खाडीपात्रात उतरून आंदोलन करणार

अवैध वाळू उत्खननावर कारवाई न झाल्यास खाडीपात्रात उतरून आंदोलन करणार

वाघवणे येथील ग्रामस्थांचा निवेदनद्वारे तहसील प्रशासनास इशारा

मालवण
वाघवणे कर्ली खाडी येथे अवैध वाळू उत्खनन सुरू आहे. अवैध वाळू उत्खननावर कारवाई न झाल्यास आम्हा ग्रामस्थांना खाडीपात्रात उतरून वाळु उत्खननाला विरोध करावा लागेल. असा इशारा वाघवणे येथील ग्रामस्थांच्या वतीने मालवण तहसीलदार वर्षा झालटे यांना निवेदन द्वारे दिला आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, आम्ही वाघवणे येथील रहिवाशी असून कर्ली खाडीत शास‌नाने बांधलेल्या कर्ली पुलानजीक पूर्वेकडे आमची घरे, मांगर भातशेती, माडबागायती आदी स्थावर मिळकती आहेत. सद्‌यस्थितीत वाघवणे येथील रेती उपगट D5 या वाघवणे व आंबेरी या गावांच्या सीमेवर असलेल्या रेती उपगटामध्ये रात्रंदिवस बेसुमार वाळु उत्खनन अनधिकृत रित्या चालू आहे. तसेच रात्रीच्या वेळी कर्ली पुलापासून 300 मीटरवर म्हणजेच प्रतिबंधीत क्षेत्रात जोरदार अवैध वाळू उत्खनन सुरु आहे. कर्ली पुलास धोका निर्माण झाला आहे अशा आशयाचे पत्र


काही दिवसांपूर्वी सार्वजनीक बांधकाम विभागाकडून
दिल्याचे वाचनात आले, तरिसुद्धा बेकायदा वाळू उत्खननावर दुर्लक्ष होत आहे. तरी आपणांस विनंती आहे की या अनधिकृत वाळू उत्खननावर तात्काळ ठोस कारवाई करावी, फक्त रॅम्प उध्वस्त करणे एवढ्याच कारबाईवर न थांबता खाडीपात्रात उभ्या असलेल्या अनधिकृत होड्यांवर देखील कारवाई करावी. कारण आपण उध्वस्त केलेले रॅम्प हे तात्काल दुरुस्त करून पुन्हा बेकायवा वाबु उत्खनन सुरु होते.


बेकायदा वाळू उत्खननामुळे कर्ली पुलास धोका निर्माण झाला आहे, खारबंधाऱ्याची सुरक्षितता धोक्यात आली आहे परिणामी आम्हा ग्रामस्थांच्या माड बागायती, भातशेतीच्या जमिनी, पिण्यायोग्य पाणी असलेल्या विहिरी धोक्यात आलेल्या आहेत.

किमान एवढ्या गंभीर बाबींचा विचार करून तरी या अवैध वाळू उत्खननावर कारवाई करावी ही विनंती. नाहीतर नाईलाजाने आम्हा ग्रामस्थांना खाडीपात्रात उतरून वाळु उत्खननाला विरोध करावा लागेल, आणि असे करताना काठी अनुचित प्रकार घडल्यास त्यास प्रशासन जबाबदार राहिल. असे निवेदनात म्हटले आहे. यां निवेदनावर विरेश मांजरेकर, महेश चव्हाण यांसह अन्य ग्रामस्थ यांच्या स्वाक्षरी आहेत.

तहसीलदार यांचे कारवाईचे आदेश

कर्ली, कालावल खाडी पात्रात अनधिकृत वाळू उतखनन वाहतूक विरोधात यापूर्वी धडक कारवाई करण्यात आली आहे. आता नव्याने आजपासून पथक तैनात केली जातील. बंदर व पोलीस प्रशासन यांनाही संयुक्त कारवाई बाबत पत्र दिले जाईल. तसेच बंदर विभागाकडून अनधिकृत वाळू होड्यांची तपासणी केली जाणार असल्याचे तहसीलदार वर्षा झालटे यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा