You are currently viewing भाजपा पदाधिकाऱ्यांची बीएसएनएल कार्यालयाला धडक

भाजपा पदाधिकाऱ्यांची बीएसएनएल कार्यालयाला धडक

*भाजपा पदाधिकाऱ्यांची बीएसएनएल कार्यालयाला धडक*

*बांदा पंचक्रोशीतील समस्यांबाबत दिलेले निवेदन*

बांदा:-

इतर दूरसंचार कंपन्यांनी आपला टेरिफ दर वाढवल्याने ग्राहक पुन्हा एकदा बीएसएनएल कडे मोठ्या प्रमाणात वळताना दिसत आहेत. परंतु अशा ग्राहकांना सेवा देण्यात बीएसएनएल चे व्यवस्थापन अपुरे पडताना दिसत आहे. याबाबत बांदा पंचक्रोशीतील विविध गावांमधील समस्या घेऊन बांदा भाजपा पदाधिकारी गुरु कल्याणकर व इतर ग्रामस्थ यांनी बीएसएनएल कार्यालयाला आज धडक देत जाब विचारला.
यावेळी गुरु कल्याणकर यांच्याकडून अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली.यावेळी त्यांनी असनिये,घारपी,डोंगरपाल या गावांमध्ये वर्ष-दीड वर्षांपासून केवळ टॉवर उभे करण्यात आले होते.आम्ही आवाज उठवल्यावर सर्व यंत्रणा तातडीने बसवण्यात आली परंतु अजूनही ते टॉवर कार्यान्वित का झाले नाहीत असे विचारले असता, बीएसएनएलचे सिंधुदुर्ग उप-महाप्रबंधक आर.व्ही.जानू यांनी सिग्नल देण्याकरिता आवश्यक भाग आला नव्हता. तो आता आला असून 15 जानेवारी पर्यंत सदर तिन्ही टॉवर आपण चालू करू असे आश्वासन दिले.तसे न झाल्यास ग्रामस्थांसह कार्यालयाच्या दरवाजावर बसुन आंदोलन करण्याचा व कार्यालयच उघडू न देण्याचा इशारा संतप्त ग्रामस्थांकडून देण्यात आला.यावेळी तांबोळी, पडवे व पडवे माजगाव येथील नियोजित टॉवरची जागा पाहणी त्वरित करण्याची मागणी कल्याणकर यांनी केली. त्यावर बीएसएनएलचे वरिष्ठ अधिकारी श्री फुटाणे यांनी 12 तारीखला पाहणी करण्यासाठी येण्याचे आश्वासन दिले. तसेच मागील आठ दिवस बंद असलेल्या फुकेरी टॉवर बाबत विचारणा केली असता, अंडरग्राउंड ओएफसी केबल कट झाल्याने टॉवर बंद झाला असल्याचे सांगितले व त्वरित टीम पाठवून संध्याकाळपर्यंत टॉवर चालू करण्याचे आश्वासन देण्यात आले.यावेळी बांदा शहरातील रेंज व इंटरनेट स्पीड बाबत समस्या मांडण्यात आली. त्यावर येत्या दोन दिवसात संबंधित अधिकाऱ्यांना पाहणी करता पाठवण्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
दिलेली आश्वासने न पाळल्यास मोठ्या स्वरूपात आंदोलन उभारू असारा इशारा देखील यावेळी देण्यात आला.यावेळी बांदा भाजपा पदाधिकारी गुरु कल्याणकर,हेमंत दाभोलकर,सागर सावंत,मिलिंद देसाई,सागर गावडे,संजय सावंत,शरद सावंत,प्रवीण देसाई आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा