*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य लेखक कवी अरुण वि. देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*
__________________________
श्रीगोंदवलेकर महाराज काव्यचरितावली काव्यपुष्प-१०६ वे
___________________________
हे शेवटचे निरूपण भजन । श्री महाराज होते जाणून ।
सांगती ते कळवळून । मोठेच महत्व नामाचे,जाणा तुम्ही ।। १ ।।
श्री महाराजांचे विलक्षण सांगणे । हे ऐकुनी भक्तांचे डोळे भरून येणे । मनाचे मना समजणे । येथे आले घडोनी ।।२।।
श्री महाराजानी अभंग म्हटला –
_________________
सरली आयुष्याची गणना । आता येणे नाही पुन्हा ।।१ ।।
तुझ्या पायी मन राही । हेचि सुख आम्हा देई ।।२ ।।
तुझ्या पायी पडली मिठी । आता जातो उठाउठी ।। ३ ।।
दीनदास म्हणे रघुनाथा । आज्ञा द्यावी मज आता ।।४ ।।
*******
वातावरण सारे भारलेले । अश्रूंनी डोळे डबडबलेले ।
हृदय सर्वांचे पिळवटलेले । भक्त तरीही तसेच बसलेले ।।५।।
श्री महाराजानी सगळ्यांकडे पाहिले । सावकाश शब्द उच्चरिले । अखेरच्या अभंगाचे बोल उमटले । त्यांच्या मुखातुनी ।। ६ ।।
”
भजनाचा शेवट आला । एक वेळ राम बोला ।। १ ।।
आजि पुण्यपर्वकाळ । पुनः नाही ऐसी वेळ ।। २ ।।
रामनाम वाचे बोला । आत्मसुखामाजी डोला ।।३ ।।
दीनदास सांगे निका । रामनाम स्वामी शिक्का ।। ४ ।।
*******
क्रमशः करी लेखन कवी अरुणदास
___________________________
कवी अरुणदास – अरुण वि. देशपांडे- पुणे.
___________________________