*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*ईश्वराचं…. अस्तित्व !*
उमलतांना सांगून गेलास
अजूनही गाभारा जिवंत आहे
माझं बोट धरून आजही
तुला काही काळ चालायचं आहै
वाटेवर तुझ्या प्रकाश पडावा
अशी मळवाट अजूनही दिसत नाही
विसरायच तर सार!तू ठरवलं होत
पण जगानं त्याच भान ठेवलं नाही
एकवार तरी माझ्या पाठीवरून
फिरव तुझा बांधलेला हात
सार माझं जगणचं साचलयं
ठायी ठायी तुझ्या ह्दयांत
जगण्याला कुस्करून आभाळ भरून घे
आकाश तुझं!प्रकाश झोतात दिसेल
स्वर्गिय गाभा-यात !तुझ्या गुलाबांतून
ईश्वरी रूप तुझ्या अंगणात अवतरेल
धरेला बिलगून वारिया उतरला
भुईत रूजत ईश्वर उमलला
अद्भुत माया ईश्वरी काया
प्रकृती पुरूष!ईश्वर अवतरला
बाबा ठाकूर धन्यवाद
निसर्ग हाच ईश्वर…तीन