झाराप येथे ५१ लाख २८ हजारांची गोवा बनावटीची दारु जप्त
राज्य उत्पादन शुल्कच्या कुडाळ पथकाची कारवाई
बांदा
ख्रिसमस व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क कुडाळ प्रथकाने बुधवारी पहाटेच्या सुमारास झाराप येथे मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरा गोवा बनावटी बेकायदा दारु वाहतुकीवर कारवाई केली. या कारवाईत ५१ लाख २८ हजार दारुसह एकून ६१ लाख २८ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले.
याबाबत अधिक माहीती अशी की, गोव्यातून सिंधुदुर्गात गोवा बनावटीची बेकायदा दारू वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कुडाळ पथकाला प्राप्त झाली होती. त्यानुसार झाराप येथे वाहनांची तपासणी करीत असताना सहाचाकी कंटेनरची (डीडी ०१ एच ९९४१) दारुबंदी गुन्हयांतर्गत तपासणी केली असता गोवा बनावटी दारुचे विविध ब्रँन्टचे १०२० बॉक्स जप्त केले. मद्य वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले सहाचाकी वाहनासह एकूण ६१ लाख २८ हजार किंमतीचा मुद्येमाल जप्त केला. सदर कारवाईमध्ये संशयित ओम प्रकाश गुप्ता (३२, रा. घनसोली, नवी मुंबई), शिव लखन केवट (३०, रा. रीवा, मध्यप्रदेश) यांना वाहनासह ताब्यात घेण्यात आले.
सदर कारवाई अधीक्षक मनोज शेवरे यांच्या मागदर्शनाखाली कुडाळ निरीक्षक एम. एस. गरुड, दुय्यम निरीक्षक आर. बी. मोरे , दुय्यम निरीक्षक यु. एस. थोरात, दुय्यम निरीक्षक ए. ए. वंजारी, सहाय्यक दुय्यम निरीक्षक रमाकांत ठाकूर, जवान नि वाहनचालक एस. एम. कदम , जवान एन. पी. राणे, व्ही. एम. कोळेकर यांच्या पथकाने केली. पुढील तपास निरीक्षक एम. एस. गरुड करीत आहेत.