You are currently viewing महामार्गावरील तरंदळे बॉक्‍सवेलवर दुचाकी आदळली, तरूण गंभीर जखमी…

महामार्गावरील तरंदळे बॉक्‍सवेलवर दुचाकी आदळली, तरूण गंभीर जखमी…

महामार्गावरील तरंदळे बॉक्‍सवेलवर दुचाकी आदळली, तरूण गंभीर जखमी…

कणकवली

मुंबई गोवा महामार्गावरील तरंदळे बॉक्‍सवेलवर दुचाकी आदळून झालेल्‍या अपघातात फोंडाघाट येथील तरूण गंभीर जखमी झाला आहे. दुपारी सव्वा एकच्या सुमारास हा अपघात झाला. संदेश एकनाथ लाड (वय ३०, रा.फोंडाघाट) असे त्‍या जखमीचे नाव आहे.
संदेश लाड हा आपल्‍या ताब्‍यातील दुचाकी (एमएच ४७ एएल ६३८९) घेऊन फोंडा ते कणकवली येत होता. तरंदळे बॉक्‍सवेलवर त्‍याच्या दुचाकीखाली दगड आला. त्‍यानंतर त्‍याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यात तो दुचाकीसह महामार्गावर आदळला. यात त्‍याच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक मनोज गुरव, महिला पोलीस सुप्रिया भागवत यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी झालेल्या संदेश लाड यांना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. यावेळी कणकवली शहरातील सामाजिक कार्यकर्ते उत्तम पुजारे यांनी देखील मोलाचे सहकार्य केले. संदेश लाड याच्या डोक्याला गंभीर इजा असल्‍याने त्‍याला अधिक उपचारासाठी त्यांना जिल्हा रुग्णालय ओरोस येथे अधिक उपचारासाठी हलविण्यात आले आहे. याबाबत अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा