You are currently viewing विलगता प्रेमाची

विलगता प्रेमाची

*ज्येष्ठ कवयित्री सौ.कविता किरण वालावलकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*विलगता प्रेमाची* 

 

विलगता ही प्रेमाची

कासावीस करी मन

आसवांनी भरलेली

भूतकाळी आठवण

 

अहंकारात असते

विलगता ही प्रेमाची

सलोख्याने स्पंदनात

आपणच जपायची

 

मीपणा सदा ठरतो

प्रेमामध्येच घातक

निस्वार्थ अशा प्रेमाला

असतोच तो घातक

 

खायला उठते मन

नसता प्रेम जवळ

अबोल रहाणे करी

विलगतेला प्रबळ

 

एकानेच तरी घ्यावे

प्रेमामध्ये समजून

तर विलगता जाते

प्रेमामध्ये हरवून

 

सौ कविता किरण वालावलकर

दावणगिरी कर्नाटक

प्रतिक्रिया व्यक्त करा