मुंबई :
दिनांक 1 डिसेंबर रोजी अक्षरमंच सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान यांचेतर्फे *अखंड वाचनयज्ञ 2024* चे आयोजन करण्यात आले होते. बालक मंदिर संस्था टिळक चौक कल्याण येथे आयोजित या कार्यक्रमात शैलजा करोडे यांनीही उस्फूर्त सहभाग माय मराठीच्या सेवेत नोंदविला.
प्रतिष्ठानतर्फे कवयित्री अलका नाईक, दया घोंगे, ज्ञानदा वाचनालयाचे अशोक सावंत व आयोजक हेमंत नेहेते यांचे हस्ते शैलजाताईंचा सन्मान करण्यात आला.