आज वेंगुर्ल्यात होणार देशाभिमान जागविणारे दोन अंकी नाटक ‘मिशन -59’
वेंगुर्ला
येथे 63 वी महाराष्ट्र राज्य मराठी हौशी मराठी नाट्य स्पर्धा 2024 – 25 सुरू आहे. या नाट्य स्पर्धेत आज मायभूमी प्रतिष्ठान, सावंतवाडी निर्मित देशाभिमान जागविणारे दोन अंकी नाटक ‘मिशन -59’ आज सोमवार दिनांक 2 डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजता मधुसूदन कालेलकर नाट्यगृह, वेंगुर्ले येथे सादर होणार आहे. या नाटकाचे लेखक प्रकाश माजलकर असून दिग्दर्शक प्रवीण मांजरेकर आहेत. तसेच सूत्रधार प्रा. एन. डी. कार्वेकर, नेपथ्य मिलिंद कासार, वेशभूषा परेश परब, प्रकाश योजना संजय तोडणकर, पार्श्वसंगीत गणेशप्रसाद गोगटे, रंगभूषा नित्यानंद पेडणेकर यांची असून यात कलावंत म्हणून दिग्दर्शक प्रवीण मांजरेकर. मिलिंद कासार. मितल धुरी. कु. सृजन निवृत्ती कार्वेकर, विनय वाडकर, ललित हरमलकर, अभिषेक कासार, कुणाल कासार, राहुल हजारे, जनार्दन सावंत, सार्थक वाटवे, दादू हरमलकर व परेश परब यांनी भूमिका साकारल्या आहेत. तरी देशाभिमान जागविणाऱ्या या नाटकाचा नाट्य रसिकांनी लाभ घ्यावा, असे आयोजकांनी कळविले आहे