You are currently viewing खानोली-सुरंगपाणी येथील दत्तमंदिरात दि. ८ ते १४ कालावधीत दत्तमहोत्सव…

खानोली-सुरंगपाणी येथील दत्तमंदिरात दि. ८ ते १४ कालावधीत दत्तमहोत्सव…

*खानोली-सुरंगपाणी येथील दत्तमंदिरात दि. ८ ते १४ कालावधीत दत्तमहोत्सव…*

वेंगुर्ले

खानोली सुरंगपाणी येथील श्री विठ्ठल पंचायतन येथे दि. ८ ते दि. १४ डिसेंबर कालावधीत दत्तजन्म महोत्सवांतर्गत धार्मिक कार्यक्रम, अध्यात्मिक गुरुचरित्र पठण व सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविधांगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
त्यानिमीत्त रविवार दि. ८ डिसेंबर ते शनिवार दि. १४ डिसेंबर पर्यत दररोजन सकाळी ८ वाजता श्रीं ची पाद्यपुजा सकाळी १० वाजता गुरुचरित्र पारायण पठण दुपारी आरती, तिर्थप्रसाद, नैवेद्य सायंकाळी ७ वाजता स्थानिक सुस्वर भजने, शुव वार दि. १३ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता श्रीं ची पाद्यपूजा सकाळी ९ वाजता गुरुचरित्र पारायण पठण, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, नैवेद्य, सायंकाळी ७ वाजता सप्तरंग कलामंच होडावडा प्रस्तुत ट्रिकसीनयुक्त दोन अंकी नाट्यप्रयोग ‘ब म्हांडनायक’ शनिवार दि. १४ डिसेंबर रोजी मार्गशीर्ष पौर्णिमा दिनी श्री दत्तजयंती सकाळी ८ वाजता श्रीं ची पाद्यपूजा, सकाळी ५ वाजता गुरुचरित्र पारायण पठण समाप्ती, सकाळी १०.३० वाजता दत्तनामस्मरण (बुवा रुपेंद्र परब), दुपारी आरती, तिर्थप्रसाद, नैवेद्य सायंकाळी ६ वाजता दत्तजन्म समयी पुष्पवृष्टी, पालखी प्रदक्षिणा, भिक्षादान, आरती सायंकाळी ७.३० वाजता नाईक-मोचेमाडकर दशावतार नाट्यमंडळ यांचा नाथसांप्रदायावर आधारित ‘परकायाप्रवेश’ हा दशावतारी नाट्यप योग, रविवार दि. १५ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता श्रीं ची पाद्यपूजा, सकाळी १० वाजता श्री सत्यदत्तपुजा (यजमान सौ. व श्री. शंकर पार्सेकर), दुपारी आरती, तिर्थप्रसाद, पालखी प्रदक्षिणा, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी ७ वाजता गावडेवंश तरुणहौशी नाट्यमंडळ हरमल गोवा यांचा ३ अंकी नाट्यप्रयोग ‘काहीतरी घडतंय इथं’ असे कार्यक्रम निश्चित आहेत. या धार्मिक, अध्यात्मीक व सांस्कृतिक कार्यव मांचा लाभ भाविक व रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून घ्यावा असे आवाहन श्री विठ्ठल पंचायतनाचे व्यवस्थापक दादा पंडित महाराज यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा