You are currently viewing आरवलीचा वेतोबा…

आरवलीचा वेतोबा…

 

आरवलीचे श्री देव वेतोबा हे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील अत्यंत जागृत असे पुरातन देवस्थान असून वेंगुर्ला शिरोडा रस्त्यावर वेंगुर्ला शहरापासून १२ किलोमीटर अंतरावर वसलेलं आहे. श्री देव वेतोबा म्हणजे केवळ आरवलीवासियांचाच नव्हे तर अवघ्या दक्षिण कोकणातील लोकांचा पिढ्यानपिढ्याचा पालक, रक्षक आणि संकट निवारक म्हणून ओळखला जातो. श्री देव वेतोबा मंदिराच्या प्रवेशद्वारावर येताच रस्त्यावरूनच मंदिराच्या गाभाऱ्यात उभ्या असलेल्या वेतोबाचं दर्शन होतं. विठोबाच्या गाभाऱ्यात श्री देव भुमय्या, श्री देवपूर्वस, श्री देव रामपुरुष, श्री देव बाराचा ब्राह्मण, श्रीदेवी भावकाई यांच्या सुद्धा पाषाणमूर्ती स्थापित केलेल्या आहेत. मंदिराच्या गाभाऱ्यात वेतोबाची भव्य अशी मानवाकृती द्विभुज मूर्ती उभी आहे. सुमारे दोन हजार लोक बसू शकतील एवढे प्रशस्त वेतोबा मंदिर असून हे मंदिर सुमारे इ.स.१६६० मध्ये बांधण्यात आले तर सभामंडप इ. स. १८९२ ते १९०० मध्ये बांधण्यात आला आहे. हे देवालय दुमजली असून नगारखाना तीन मजली आहे.

मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा म्हणजेच देवदीपावली दिवशी श्री देव वेतोबाचा जत्रोत्सव भाविकांच्या अलोट गर्दीत पार पडतो. यावेळी वेगवेगळ्या प्रकारचे पाऊस, नारींगणे आदी फटाक्यांची होणारी आतषबाजी हे देखील जत्रोत्सवाचे खास आकर्षण असते. श्री देव वेतोबाच्या नवसाला केळीचा घड देण्याची येथे प्रथा आहे. आरवली गावातील लोक मानतात की, वेतोबा गावभर फिरत असतो त्यामुळे त्याचे जोडे झीजतात. त्यामुळे वेतोबाला चामड्याचे भले मोठे जोडे देखील दिले जातात. विठोबा म्हणजेच वेताळ. येथील भक्त आदराने वेताळाला वेतोबा असे म्हणतात. या वेताळांमध्ये भुताखेतांना व अपप्रवृत्तींच्या शक्तीला विरोध करण्याची ताकद असते. त्यामुळेच आरवलीतील वेतोबाची ख्याती सर्व दूर पसरली आहे. दीड ते दोन फूट लांबीच्या चपला वेताळाच्या पायात सरकवल्या जातात व त्यानंतर वेतोबा नगरप्रदक्षिणा मारण्यासाठी बाहेर पडतो. यावेळी काळ्याशक्ती सुद्धा त्याच्यासमोर टिकाव धरू शकत नाहीत. अशा या देवाचे संकटकाळी स्मरण केले तरी तो पाठीशी उभा राहतो.

आरवलीच्या वेतोबा मंदिरात गेल्यावर मोठमोठ्या चपलांचा ढीग दिसतो. मंदिराच्या समोरील दुकानांवर केळ्याचे घड लक्ष वेधून घेतात. नवसपूर्ती साठी भक्तगण केळ्याचा अख्खा घड वेताळाच्या चरणी अर्पण करतात. कोकणातील श्रद्धेचा आणि निसर्गप्रेरणेचे एक महत्त्वाचे स्थान म्हणून वेतोबा देवस्थान ओळखले जाते.

——————————————————————-

*लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आरवली येथील श्री देव वेतोबा देवस्थानच्या वार्षिक जत्रोत्सवास आमच्या हार्दिक शुभेच्छा !* 🌹🙏🏻🌹

 

*श्री देव वेतोबा देवस्थान – आरवली*

तालुका वेंगुर्ला जिल्हा सिंधुदुर्ग फोन : ०२३६६ – २९९८८७

(न्यास नो. क्र. ए – ८ / सिंधुदुर्ग ४१६५१८ )

*विश्वस्त मंडळ*

अध्यक्ष – श्री. जयवंत राय

सेक्रेटरी – श्री. सावळाराम उर्फ आबा टांककर

खजिनदार – श्री. मंगेश कांबळी

विश्वस्त – डॉ. प्रसाद प्रभूसाळगावकर

विश्वस्त – श्री. सुनील दळवी

विश्वस्त – श्री. पुरुषोत्तम दळवी

लीगल ॲडव्हायझर – ॲड. बी. एन. प्रभू

चार्टर्ड अकाऊंटंट – श्री. जीवन गवस

————————————————–

*श्री जागबाई भक्त निवास*

राहण्याची व जेवणाची उत्तम सोय

*श्री जागबाई प्रसाद मंगल कार्यालय*

लग्न, मुंज, सभा, संमेलने व इतर धार्मिक कार्यक्रमांसाठी प्रशस्त हॉल उपलब्ध

*प्रोप्रा. श्री सुरेंद्र उर्फ ज्ञानेश्वर वासुदेव आपटे*

पत्ता मु. पो. आरवली, जागबाई मंदिर जवळ, ता. वेंगुर्ला जि. सिंधुदुर्ग

संपर्क – 02366- 227135 / 9422162051 / 9545132177

————————————————–

*श्री. प्रल्हाद केळुस्कर (बंधु)*

मच्छी व्यवसाय, केळुस

कालवी बंदर ता. वेंगुर्ला जि. सिंधुदुर्ग

मो. 9422576844

—————————————————

*श्री लक्ष्मी साडी सेंटर*

आमच्या येथे विविध प्रकारच्या फॅन्सी साड्या, ड्रेस मटेरियल, जेन्ट्स व लेडीज तसेच लहान मुलांचे सर्व प्रकराचे तयार कपडे मिळतील.

प्रोप्रा. दशरथ गोपाळ गावडे

मो. 9823370830

पत्ता : मेन रोड बाजारपेठ शिरोडा, ता. वेंगुर्ला

—————————————————

*वेताळेश्वर इलेक्ट्रिकल्स*

इलेक्ट्रिकल्स मटेरियल, लाईट फिटिंग वर्क्स, इन्व्हर्टर सप्लायर्स

प्रो प्रा. निकेत बाळे

पत्ता : मु. पो. आजगाव इंग्लिश मिडीयम हायस्कूल समोर

मो. 7775867609 / 8698969641

—————————————————-

*श्री देव वेतोबा प्रसाद मंगल कार्यालय (पाटणकर हॉल)* 

प्रो. प्रा. गोविंद ग. पाटणकर

मु. पो. आरवली देऊळवाडा (सोन्सुरे कॉर्नर) ता. वेंगुर्ला

मो. 9421268251

—————————————————

*Paradise Holiday inn*

Room, Ac / Non Ac Cottages & Restaurant Services

(We Serve Fresh Seafood)

Sagartirtha, Arawali Shiroda Beach, Tal. Vengurla, Dis. Sindhudurg – 416518

Website : www.paradiseholidayinn.com

Contact No. – 9637958946 / 9370270900 / 9168489805

————————————————–

*वेतोबा लॉन्ड्री*

सर्व प्रकारचे कपडे इस्त्री व ड्राय क्लीन करून मिळतील.

प्रोप्रा – श्री. विजय आरोलकर

मो. 9823994747 / 7796817883

पत्ता –

▪️आरवली (देऊळवाडी), यश राईस मिलच्या बाजूला, आरवली, ता. वेंगुर्ला

▪️शिरोडा शहर, माऊली मंदिराच्या बाजूला, ता. वेंगुर्ला

—————————————————-

*श्री मयूर आरोलकर* 

माजी उपसरपंच, आरवली

सामाजिक कार्यकर्ते

————————————————–

*श्री वेतोबा मिनी मार्ट*

किराणा आणि जनरल स्टोअर्स

सर्व घरगुती उपयोगी वस्तू उपलब्ध

मो. 9673694204

8888641134

प्रतिक्रिया व्यक्त करा