*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*
*कुणबी*
राब राबता वावरी
येई कुणब्यासी घाम
उभे शिवार तयाचे
त्यास वाटे चारीधाम
मृगसरी बरसता
झाली लगबग सुरु
बी बियाणाची आता
साठवण लागु करू
उभ्या मळ्यात दिसते
माझी उभी पंढरी
माझी रखुमाई माय
पिकाची राखण करी
पाटाच्या पाण्यात दिसे
माझा पांडुरंगा उभा
माती मातीच्या कणात
त्याच्या आशीर्वादाची कृपा
मोत्याचं कणीस डुले
झुळू झुळू वाऱ्यासवे
दिंडी पाखरांची येते
दाणा टिपण्यास नवे
हिरवी मिरची कोथंबीरी
मेथी पालक गवार
सोनसळी रानामध्ये
माझं डोलतं शिवार
माझं हेचं मायबाप
माझी भरली पंढरी
हिरव्यागार रानामध्ये
मला दिसतो श्रीहरी
*शीला पाटील. चांदवड.*