*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*शब्द..वाया घालवू नका…!!*
जीवन ज्यांना कळलं
गाजावाजा करू नका
शब्दांना समजावून सांगा
शिकवायला जाऊ नका..
गृहित धरण्याचा फटका
उच्चारांने शब्दांना दिला
मुद्रित माध्यमाचे माहात्म
कळसचं कापून घेतला..
आपत्तीची प्रतिक्षा कशाला
शब्दांचे माखले हात
खैरातीच्या अजस्र धांदलीत ..शब्दचं
कल्लोळाकडे पाठ फिरवतात
शब्दांचे आटलेले प्रेम
मनावर घेऊ नका
शब्दपंचायतीचं रक्षण कराया
शब्दांना…वाया घालवू नका
शब्दनिष्ठेला तिलांजली देताचं
शब्दसाखळी कोसळून जाईल
नकारात्मक सूर खटकेलही
जिंदगानीवर.. शब्दांचा बिब्बा राहिलं
बाबा ठाकूर धन्यवाद
बत्तीसावे..ठाकूरी उवाच..चार..!!