You are currently viewing नशा सोडा आणि देश जोडा:गणेश खानवटे

नशा सोडा आणि देश जोडा:गणेश खानवटे

*नशा सोडा आणि देश जोडा:गणेश खानवटे*

21व्या शतकात जगत असताना तरुण पिढी नशेच्या विळख्यात अडकत चालली आहे.तरुणांनो जागे व्हा, स्वतःच्या क्षमता ओळखा,नशा सोडा भारत देश आपोआपच जोडला जाईल ,असा संदेश शिवभक्त गणेश राजू खानवटे यांनी आपल्या मार्गदर्शनातून दिला. ते वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,तळेरे येथील डाॅ. एम.डी.देसाई सांस्कृतिक सभागृहात बोलत होते.
यावेळी माजी विस्तार अधिकारी सुहास पाताडे,श्रावणी कम्प्युटर्सच्या सर्वेसर्वा श्रावणी मदभावे,प्राचार्य अविनाश मांजरेकर,शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी,उपस्थित होते. यावेळी प्रशालेच्या वतीने गणेश खानवटे यांचा शाल व श्रीफळ देवुन सत्कार करण्यात आला.
4जुलै 2021 या दिवसापासून गणेश खानवटे यांनी *365 गडकिल्ले मोहिम* या आपल्या अनोख्या प्रवासाला सुरुवात केली.स्वत: नशेच्या विळख्यात अडकलेल्या गणेश खानवटे यांनी रायगडावर छत्रपती शिवराय यांच्या स्मरणार्थ नशा न करण्याची शपथ घेतली.त्या वेळेपासून ते दुर्गभ्रमंती करत- करत संपूर्ण देशात प्रवास करत असताना वाटेत असणाऱ्या शाळांना,महाविद्यालयांना भेटी देत. बेटी बचाव,झाडे लावा झाडे जगवा,नशामुक्त भारत बनवूया, आपल्या जवानांचा सन्मान करूया,या चार संकल्पना घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात.
मूळचे तुळजापूरचे असणारे गणेश खानवटे यांनी आतापर्यंत 400 शाळांना व्याख्यान दिले आहे.त्यांच्या मते तरुण हे भारताची शक्ती आहेत. ते सजग असतील,निर्व्यसनी असतील तर देशाची प्रगती व्हायला वेळ लागणार नाही.
संपूर्ण देशभर हा सुंदर विचार घेऊन भ्रमंती करणारे, तरुणांना प्रेरित करणारे गणेश खानवटे यांना प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी आपले खाऊचे पैसे प्रवासाला हातभार,खारीचा वाटा म्हणून दिले….

प्रतिक्रिया व्यक्त करा