You are currently viewing संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा

संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार अरूण गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*”संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा”* 

अनुपम सोहळा स्वर्गीचे सुख आनंद

ज्ञानदेवांनी घेतली समाधी संजीवन।।धृ।।

कार्तिक वद्य त्रयोदशी देवे दिधली तिथ

अलंकापुरी शिवपिठ स्थित निळकंठ

ब्रह्मादीक इंद्रांचे इंद्रायणी तपस्थान।।1।।

आले विठ्ठल रुक्मिणी गरुड हनुमंत

आले हरिहर विधाता अलंकापुरी संत

वैष्णवांनी केला हरिनाम गजर अखंड।।2।।

विहित कार्य संपले ज्ञानदेव सांगत

शोकाकुल भावंडे देव संत महंत

भगवंतानी केले सांत्वन धीर देत।।3।।

ज्ञानदेवांनी घेतले सिद्धेश्वराचे दर्शन

नामदेवांची विणा घेऊन केले भजन

सोनियाचा दिवस आज अमृते सांगत।।4।।

ज्ञानदेवांनी जोडीले हात मिटुनी नेत्र

भीम मुद्रा लावून झाले ज्ञानां समाधीस्थ

चैतन्य सदैव कैवल्याचे देत दान ।।5।।

नऊ दिवस समाधी पाशी चाले कीर्तन

निरोप घेती देव संत जन भारावून

अश्वथ्थ सांगे ज्ञानदेव आहेत चिरंतन।।6।।

जोवर चंद्र तारे दिनकर नांदत

जोवर क्षितीमंडळ समुद्र जळ पर्वत

तोवर समाधी राहे विठोबांचे आशीर्वाद।।7।।

 

श्री अरुण गांगल कर्जत रायगड महाराष्ट्र.

पिन.410201.Cell.9373811677.

प्रतिक्रिया व्यक्त करा