You are currently viewing क्षण परतून आले तर

क्षण परतून आले तर

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*क्षण परतून आले तर*

 

होईल का कधी असे

परतून येतील क्षण

सुखाची पुन्हा बरसात

त्यात चिंब भिजेल मन…

 

बालपण सौख्यभरे

भेटतील का पुन्हा मैत्रीणी

मिळून सर्व एकमेकींसह

खेळू लगोरी काचापाणी….

 

आईच्या हातचे पदार्थ

बाबांची शिस्त प्रेमळ

भावंडं लहान मोठी सारी

असतील भोवती जवळ…

 

सुखाच्या संसारातील

गोष्टी पुन्हा आठवतील

आनंदाच्या गार लहरी

मनात पुन्हा स्पर्शतील….

 

दूर उडालेली पाखरं

पुन्हा येतील का पंखाखाली

क्षण परतून आले तर मग

हसरं घरकुल सांजसकाळी…

 

क्षणक्षण सारे आनंदाने

आयुष्यातील भोगून घ्यावे

परतून कधीतरी येतील क्षण

वाट न बघता जगून जावे…!!

 

°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

अरुणा दुद्दलवार @✍️

प्रतिक्रिया व्यक्त करा