*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री उज्ज्वला सहस्त्रबुद्धे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*प्राजक्त…*
सकाळ प्रहरी अंगणी,
प्राजक्त सडा घालतो!
नाजूक इवलीशी फुले,
तरंगत धरेवर उतरवतो!
इवल्याशा फुलांची मिजास,
सत्यभामेशी नातं सांगते!
सडा रूक्मिणीच्या दारी,
राजसपणे पसरवते!
स्वर्गीचा तो पारिजातक,
बहुमूल्य रत्न धरेचे!
चौदा रत्नांमध्ये असे,
स्थान त्याचे महत्त्वाचे!
मोतिया रंग फुलांचा,
नाजूकसा पावित्र्याचा!
केशरी देठ दाखवी ,
रंग असे वैराग्याचा!
आयुष्य त्याचे छोटेसे,
कोमल अन् सुगंधी !
कोमेजून जाईल केव्हा,
ते ना कळते कधी !
उज्वला सहस्रबुद्धे, पुणे