You are currently viewing देशाची एकात्मता व अखंडतेसाठी सानेगुरुजींचे विचार प्रेरणादायी: डॉ.संजय गोपाळ

देशाची एकात्मता व अखंडतेसाठी सानेगुरुजींचे विचार प्रेरणादायी: डॉ.संजय गोपाळ

*देशाची एकात्मता व अखंडतेसाठी सानेगुरुजींचे विचार प्रेरणादायी: डॉ.संजय गोपाळ*

(वामनराव महाडिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वक्तव्य)..

माहिती तंत्रज्ञानामुळे बदलून गेलेले जग खूप धकाधकीचे बनले आहे.या गोंगाटात पालकांना मुलांकडे द्यायला वेळ नाही,त्यामुळे मुलांमध्ये भ्रामक कल्पना निर्माण होत आहेत त्याचा परिणाम म्हणून आजची पिढी संस्कारापासून दूर ढकलली जात आहे.त्यांना साने गुरुजींच्या कार्याची माहिती करून देणे गरजेचे आहे.देशाची एकात्मता व अखंडता पून:स्थापित करण्यासाठी त्यांचे विचार विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजवायला हवेत हा हेतू ठेवून ” *शाळा तेथे कथामाला* ” हा उपक्रम आम्ही राबवतो, असे प्रतिपादन साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाचे माजी अध्यक्ष डॉ. संजय गोपाळ यांनी केले.
ते वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय ,तळेरे येथील डॉ.एम.डी.देसाई सांस्कृतिक भवनात साने गुरुजींच्या विचारांची ‘शाळा तेथे कथामाला’ या मार्गदर्शनपर कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट वडघर,माणगांव च्या कोषाध्यक्षा माधुरी पाटील, स्मारकाच्या विश्वस्त व राष्ट्रसेवा दलाच्या माजी महामंत्री सिरत सातपुते,गोपुरी आश्रमाचे व्यवस्थापक बाबू राणे,प्राचार्य अविनाश मांजरेकर,शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी उपस्थित होते.
साने गुरुजींनी अनेक प्रेरणादायी पुस्तकांचे लिखाण केले व आपल्या कृतीतून समाजाला आदर्श घालून दिला, त्यांचे महान कार्य समाजातील बालक वर्गात,तरुणांपर्यंत पोहोचायला हवे हा आमचा छोटासा प्रयत्न असे उद्गार माधुरी पाटील यांनी काढले.साने गुरुजी हे फक्त सांगत नसत तर त्यांच्या कृतीतूनही आई-वडिलांचे संस्कार प्रत्येक वेळी पाहायला मिळतात त्याबद्दलचे प्रसंग सिरत सातपुते यांनी कथन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहा.शिक्षका सूचिता सुर्वे यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा