You are currently viewing देऊळवाडा मसूरे सोसायटीच्या अध्यक्षपदी महेश बागवे यांची निवड

देऊळवाडा मसूरे सोसायटीच्या अध्यक्षपदी महेश बागवे यांची निवड

देऊळवाडा मसूरे सोसायटीच्या अध्यक्षपदी महेश बागवे यांची निवड

मालवण

देऊळवाडा मसूरे वी.का. स.सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी मसुरे गावचे सुपुत्र उद्योजक तथा माजी पंचायत समिती सदस्य महेश बागवे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी संस्थेचे सभासद अजय प्रभूगावकर, नंदकुमार मुळीक,सचिव शिवानी मसदेकर, सदस्य जगदीश चव्हाण, वासूदेव पाटील, स्वप्नील ठाकूर, हबीब शेख, अनिता पाटील
आणि सदस्य उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री हिर्लेकर यानी काम पाहिले. संस्थेचे सभासद अजय प्रभूगावकर यांच्या हस्ते महेश बागवे यांचे अभिनंदन करण्यात आले.

 

 

संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी सभासद सर्व ग्रामस्थ शेतकरी हितचिंतक यांच्या सहकार्याने आपण प्रयत्न करणार असून सर्वांना सोबत घेऊन या सोसायटीचा कारभार केला जाईल असे प्रतिपादन निवडीनंतर बोलताना महेश बागवे यांनी केले. महेश बागवे यांच्या निवडी बद्दल माजी उपसभापती छोटू ठाकूर यांनी महेश बागवे यांचे अभिनंदन केले. यावेळी पुरुषोत्तम शिंगरे, सुरेश बागवे, श्री प्रकाश मोरे,दीपक बिलये, संतोष अपराज,आशिष खोत आणि ग्रामस्थ उपस्थित होते. महेश बागवे यांच्या निवडीबद्दल उद्योजक डॉ. दीपक परब, माजी जि प अध्यक्षा सरोज परब, शिवाजी परब, जितेंद्र परब, मसुरे माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर, पंढरी मसूरकर,विलास मेस्त्री यांनी अभिनंदन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा