You are currently viewing मालवण तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मंगळवारी महत्वाची बैठक

मालवण तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मंगळवारी महत्वाची बैठक

*मालवण तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मंगळवारी महत्वाची बैठक*

*मा. आमदार वैभव नाईक यांची असणार प्रमुख उपस्थिती*

मालवण तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची महत्त्वाची बैठक मंगळवार दिनांक ०३/१२/२०२४ रोजी सकाळी ठिक ११ वाजता मालवण शहरातील लीलांजली हॉल येथे होणार आहे. मा. आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते,माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, कुडाळ विधानसभा प्रमुख संग्राम प्रभुगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक होणार आहे.

तरी या बैठकीस मालवण तालुकयातील सर्व शिवसेना पदाधिकारी, महिला आघाडीच्या पदाधिकारी, युवासेना, युवतीसेना पदाधिकारी,शिवसेना सेलचे पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे सर्व आजी, माजी लोकप्रतिनिधी तसेच सर्व शिवसैनिकांनी मंगळवारी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा