You are currently viewing नूतन कामगार अधिकारी श्री राजेश जाधव यांचे सिंधुदुर्ग बांधकाम कामगार कृती समिती यांच्यामार्फत करण्यात आले अभिनंदन

नूतन कामगार अधिकारी श्री राजेश जाधव यांचे सिंधुदुर्ग बांधकाम कामगार कृती समिती यांच्यामार्फत करण्यात आले अभिनंदन

*नूतन कामगार अधिकारी श्री राजेश जाधव यांचे सिंधुदुर्ग बांधकाम कामगार कृती समिती यांच्यामार्फत करण्यात आले अभिनंदन*

संघटना अध्यक्ष प्रसाद गावडे व प्राजक्त चव्हाण यांनी केल्या कामगार हिताच्या अनेक सूचना.

सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्ग कामगार अधिकारी म्हणून नवीन नियुक्त झालेले राजेश जाधव यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांधकाम कामगार संघटना यांच्यामार्फत स्वागत व कामगारांना होणाऱ्या अडीअडचणींबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी स्वाभिमान कामगार संघटना अध्यक्ष प्रसाद गावडे श्रमिक कामगार संघटना अध्यक्ष प्राजक्त चव्हाण, रत्नसिंधू कामगार संघटना अध्यक्ष अशोक बोवलेकर, सचिव एकनाथ सावंत,निवारा बांधकाम कामगार संघटना अध्यक्ष मंगेश चव्हाण, बांधकाम कामगार कल्याणकारी संघ सचिव रवींद्र साळकर, कोकण श्रमिक संघटना सचिव मंगेश नारींग्रेकर उपस्थित होते.
नूतन कामगार अधिकारी यांचे प्रथम स्वागत करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कामगार विषयीचे कामकाज अधिक जलद गतीने होण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. स्वाभिमान कामगार संघटना अध्यक्ष प्रसाद गावडे यांनी नवीन नोंदणी मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहेत ते लवकरात लवकर तपासावेत असे म्हणतात सुचविण्यात आले. श्रमिक कामगार संघटना अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांनी शिष्यवृत्ती अर्ज तात्काळ मंजूर करून त्यांच्या खात्यात पैसे जमा करावेत जेणेकरून कामगार वर्गाला लाभ मिळेल असे सुचविण्यात आले. रत्नसिंधू कामगार अध्यक्ष अशोक बोवलेकर यांनी चुकीच्या पद्धतीने कामगारांचे अर्ज चेक करून रद्द करण्यात आले आहेत ते योग्य प्रकारे तपासावे असे सांगितले. निवारा कामगार संघटना अध्यक्ष मंगेश चव्हाण यांनी कामगार वर्गाचे संकेतस्थळ आहे ते तात्काळ सुरू करावे अश्या सूचना करण्यात आल्या. तसेच बांधकाम कामगार संघटना सचिव रविंद्र साळकर यांनी कामगार यांना घरकुल प्रस्ताव साठी नियम अटी शिथिल करण्याची मागणी केली. चर्चेअंती कामगार अधिकारी जाधव यांनी सर्व संघटनाच्या पदाधिकारी यांनी सूचित केले की कामगार हितासाठी सर्व काही करण्यासाठी मी सदैव तत्पर आहे. आपणही चांगल्या पद्धतीने सहकार्य करावे असे सांगितले.
आचारसंहितेनंतर लवकरच भांडी संच वाटप व कीट वाटप सुरू करावे असेही सुचविण्यात आले सिंधुदुर्ग कामगार अधिकारी यांनी चांगल्या पद्धतीने कामगारांचे सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करून त्यांना त्यांचे लाभ लवकरच खात्यात जमा होतील असे आश्वासित केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा