You are currently viewing वेंगुर्ला येथे १७ जानेवारीला मोफत महाआरोग्य तपासणी शिबिर…

वेंगुर्ला येथे १७ जानेवारीला मोफत महाआरोग्य तपासणी शिबिर…

वेंगुर्ला शिवसेना व अथायु मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कोल्हापूर यांचे आयोजन…

वेंगुर्ला

तालुका शिवसेना व अथायु मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार १७ जानेवारी रोजी वेंगुर्ला ग्रामीण रुग्णालय येथे मोफत महाआरोग्य तपासणी शिबिराचे सकाळी ८.३० ते दुपारी २ वा. या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात तज्ञ डॉक्टर तपासणी करणार आहेत. तरी वेंगुर्ला शहर व नजीकच्या गावातील रहिवासी यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.
वेंगुर्ला तालुका शिवसेनेच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन आज याबाबत माहिती देण्यात आली. यावेळी शिवसेना वेंगुर्ले तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सचिन वालावलकर, उपजिल्हाप्रमुख सुनिल डुबळे व बाळा दळवी, शहरप्रमुख अजित राऊळ, डॉ.प्रल्हाद मणचेकर, डॉ. कोळमकर, डॉ.राजेश्वर उबाळे, महिला तालुका संघटक सुकन्या नरसुले, युवा सेनेचे तालुका अधिकारी पंकज शिरसाट, विवेकानंद आरोलकर, सुरेश भोसले, मनोहर येरम आदी उपस्थित होते.
या शिबिरास खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आमदार दिपक केसरकर, सावंतवाडी विधानसभा संपर्कप्रमुख शैलेश परब यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ करण्यात येणार आहे. यावेळी ५ स्पेशालिस्ट डॉक्टरांची टीम उपस्थित राहून हृदयविकार, हाडाचे विकार, मूत्र व किडनी विकार, कॅन्सर लक्षणे, सर्जरी व गेस्ट्रोएट्रोलॉजी व अन्य तपासणी करण्यात येणार आहेत, तरी नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब व शहरप्रमुख अजित राऊळ यांनी केले आहे. दरम्यान हे शिबीर ३०० लोकांसाठी मर्यादित असले तरी जास्तीत जास्त लोकांना सेवा देण्याचे प्रयत्न केले जातील. कोव्हिड नियमांचे योग्य पालन करून तसेच आजारांचे निदान नुसार मोफत उपचार करण्यात येणार आहे. यासाठी आधारकार्ड, जुने रिपोर्ट, रेशनकार्ड आवश्यक असून नोंदणी कक्षात त्याची नोंदणी करण्यात येणार आहे,अशी माहिती सचिन वालावलकर यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा