*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा मनस्पर्शी साहित्य परिवाराच्या सन्माननीय सदस्य कवयित्री सौ.आदिती मसुरकर लिखित अप्रतिम बालकविता*
🌶️🍑🌶️🌶️🍑🌶️🌶️🍑🌶️
*भोपळ्याचा राग*
तिखट लवंगी मिरचीने
भोपळ्याला एकदा चिडवले
रागाने मग भोपळ्याने
लवंगी मिरचीलाच रडवले
प्रश्नांचा भडीमार करून
भोपळ्याने घेतली फिरकी
मुळूमुळू रडत मिरचीने
घेतली गोल गोल गिरकी
भोपळ्याच्या या रागाला
आता करावे तरी काय
घासून पुसून काढताना
आठवे मिरचीला माय
रुसलेला वाटोळा भोपळा
काही केल्या हलेना
गुदगुल्या केल्या पोटाला
तरी राग त्याचा ढळेना
तेवढ्यात आली आजी
तिने भोपळ्याला पकडले
आडवे उभे चिरून त्याला
मिरचीसंगे फोडणीत ढकलले.
*🖋️© सौ. आदिती मसुरकर*
*कुडाळ, सिंधुदुर्ग*