*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य लेखक कवी श्रीनिवास गडकरी लिखित अप्रतिम बालकविता*
*थंडी* { बालकविता }
धुक्यात सारे
हरवून गेले
दंवाने झाले
डोळे ओले
निळ्या नभी
ताऱ्यांचा खेळ
उजाडायला
अजून वेळ
गारठून गेल्या
झाडें वेली
शेवग्याला कशी
फुले आली ?
शेकोटीची
खुप गम्मत
भूतांच्या गोष्टीं
वाढवी रंगत
आवळे, बोरे
बहरून गेली
मुलांची खाली
गर्दी झाली
सांज मात्र
लवकर येते
खेळाची मज्जा
घेऊन जाते
श्रीनिवास गडकरी
रोहा पेण पुणे
नावासहितच फॉरवर्ड करावे
@ सर्व हक्क सुरक्षित
9130861304