पुस्तके उपलब्ध करुन देण्यसाठी दरपत्रके सादर करण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी
समग्र शिक्षा अंतर्गत महावाचन उत्सव 2024 या उपक्रमांतर्गत इयत्ता 3 री ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या वयानुरुप वाचनीय पुस्तकांची खरेदी करवयाची आहे. त्यासाठी पुस्तके उपलब्ध करुन देण्यासाठी पुरवठादाराकडून दरपत्रके मागविण्यात येत आहेत.
पुरवठादाराकांनी सीलबंद दरपत्रके जिल्हा परिषद (प्राथमिक) शिक्षणाधिकारी यांच्या नावे दिनांक 5 डिसेंबर 2024 पर्यंत दुपारी 2 वाजेपर्यंत समग्र शिक्षा जिल्हा कार्यालयात सादर करण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. गणपती कमळकर यांनी केले आहे.
या दरपत्रकांचा नमुना शिक्षण विभाग सिंधुदुर्ग नोटीस बोर्ड व जिल्हा परिषद सिंधुदुर्ग नोटीस बोर्डवर लावण्यात आली आहे.
अटी व शर्ती
सदरची दरपत्रके प्रसिध्द केल्याच्या दिनांकापासून दि.५/१२/२०२४ पर्यंत दुपारी १४.०० वा. पर्यंत शिक्षणाधिकारी (प्राथमिक) समग्र शिक्षा, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांचे कार्यालयात सुट्टीचे दिवस वगळून स्विकारण्यात येतील तसेच सदरची दरपत्रके शक्यतो त्याच दिवशी दुपारी १६.०० वा उघडण्यात येतील. दरपत्रकाच्या लखोट्यावर महावाचन उत्सव अंतर्गत विद्यार्थ्यांना वयानुरुप पुस्तके देणेकरीता दरपत्रक (कोटेशन) असे नमूद करण्यात यावे. दरपत्रक हे लेटरहेडवर देण्यात यावे. दरपत्रकासोबत पुरवठादाराचे आधार कार्ड, पॅनकार्ड, बँक खात्याचा तपशिल यांची झेरॉक्स प्रत जोडण्यात यावी. दरपाकात विद्यार्थ्यांच्या वयानुरूप वाचनीय पुस्तकांची यादी गटनिहाय (इयत्ता 3 से 5 वी, इयत्ता 6 वी ते 8 वी व इयत्ता 9 वी ते 12 वी करीता देण्यात यावी.
ग्रंथालयीन वाचनीय पुस्तके सोबतच्या यादीप्रमाणे त्याच लेखक व प्रकाशकांची असावीत. पुस्तकांच्या दरामध्ये सवलत देण्यात यावी. पुस्तकांचे कागद दर्जेदार व प्रिटिंग सुस्पष्ट असावे. पुस्तके खूप काळ छपाई केलेली काळी व खराब, भिजलेली नसावीत. पुस्तके वापरलेली नसावीत. नवीन कोरी अशीच पुस्तके असावीत. ज्या मक्तेदाराचे दरपत्रक मंजूर केले जाईल त्याने सदरची पुस्तके समग्र शिक्षा, शिक्षण विभाग (प्राथमिक), जिल्हा परिषद सिधुदुर्ग येथे आठ दिवसाच्या आत पुरवावयाची आहेत. त्यासाठी इतर कोणताही खर्च अदा केला जाणार नाही. ज्या मक्तेदाराचे दरपत्रक मंजूर केले जाईल त्याने गटनिहाय (इयत्ता 3 री ते 5 वी, इयत्ता 6 वी ते 8 वी व इयता 9 वी ते 12 वी ) यादीनुसार सुस्थितीत व्यवस्थित पँकीग करून पुस्तके पुरवावयाची आहेत पुस्तके कमी प्रमाणात प्राप्त झालेचे निदर्शनास तसेच पुस्तके खराब असल्याचे आढळून आल्यास ती तात्काळ उपलब्ध करून देणेची जबाबदारी आपली राहील.
पुस्तके सुस्थितीत पुरवठा केले नंतर देयक दोन प्रतीत सादर करावेत. सदरचे देयक मा. प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सिंधुदुर्ग यांच्याकडून अदा करण्यात येईल. कोणतेही दरपत्रक कोणत्याही टप्यावर मंजूर अगर नामंजूर करण्याचा अधिकार खाली सही करणार यांनी राखून ठेवला आहे. विहीत मुदतीनंतर प्राप्त झालेल्या दरपत्रकाचा विचार केला जाणार नाही.अटीयुक्त दरपत्रक स्विकारले जाणार नाही.