रब्बी हंगामापासून ई-पीक नोंदणी मोबाईल ॲपव्दारे
सिंधुदुर्गनगरी
राज्यात रब्बी हंगाम 2024 पासून हे पीक पहाणी डिजिटल क्रॉप सर्वे DCS मोबाईल अॅप व्दारे पीक नोदणी करावयाची आहे. महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नौदवहया (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे) नियम, 1971 नियम 30 अनुसार खंड 4 मधील नमूना 12 बाबत सूचना क्रमांक 2 मध्ये पीक पाहणी दुरुस्तीबाबत कार्यपध्दती नमूद केलेली आहे. गाव नमूना 12 मध्ये जाहीर केलेल्या पीक पहाणी संदर्भात दुरुस्तीसाठी प्राप्त अर्ज / हरकत या मंडळ अधिकारी यांनी संबंधित गावाला भेट देऊन आणि योग्य ती चौकशी करून दुरुस्त करण्याची तरतुद महाराष्ट्र जमिन महसूल अधिकार अभिलेखात करण्यात आली आहे.
डिजिटल क्रॉप सर्वे (DCS) मध्ये केंद्राच्या निर्देशाप्रमाणे 100 टक्के नोंदीचे फोटो घेणे आवश्यक आहे. या नुसार खालील सुधारीत तरतूदी तयार करण्यात येत आहे.
1. गाव नमूना 12 मध्ये पीक जाहीर केल्यानंतर जर पीक, क्षेत्र, जल सिंचनाचे साधन, पड जमिनीबाबत किंवा शेरा स्तंभातील माहिती (गा.न.12, स्तंभ 2 आणि 4 ते 11) चुकीची जाहीर झालेचे निर्देश्नास आल्यास किंवा संबंधित खातेदाराने अशी चुक दुरुस्त करण्यासाठी अर्ज दिल्यास किंवा अशा चुकीबाबत कोणताही आक्षेप प्राप्त झाल्यास, ग्राम महसुल अधिकारी सदर अर्ज आवक जावक नोंदवहिमध्ये नोंदवून मंडळ अधिकारी यांच्याकडे अग्रेषित करतील.
२. मंडळ अधिकारी यांची पीक दुरुस्ती आवश्यक असल्याची खात्री पटल्यास मंडळ अधिकारी स्थळ निरिक्षण व ऑफलाईन पंचनामा करतील व मोबाईल अॅप मध्ये सत्यापनकर्ता (verifier) लॉगिन ने पीक दुरुस्त करतील. सोबतच जमिनीत दुरुस्तीची मागणी केलेली बाब पीक किंवा पड क्षेत्र असल्यास, डिजिटल क्रॉप सर्वे अॅपव्दारे सत्यापनकर्ता (verifier) लॉगिनमधुन फोटो काढून अपलोड करतील आणि शेरा स्तंभात पीक नोंदीत दुरुस्ती केली” असे नमूद करतील.
३. वरील प्रमाणे जाहीर केलेल्या चुकीचा संबंधीत खातेदाराने जर कोणत्याही शासकीय सहाय्य योजनांचा फायदा घेतला असल्याचे पुराव्यासह सिध्द झाल्यास, मंडळ अधिकारी सदर दुरुस्तीची बाब, संबंधित सहाय्य यंत्रणेस तात्काळ कळवतील. सदर दुरुस्ती हि फक्त हंगाम कालावधीत व त्यापुढील 15 दिवसात करता येईल. प्रति हंगाम करण्यात येणाऱ्या दुरुस्त्या या हंगाम संपल्यानंतर अहवाल स्वरुपात दर्शविण्यात येतील व archives मध्ये कायम स्वरुपी जतन करण्यात येतील.