You are currently viewing दाणे पेरत जातो …!!

दाणे पेरत जातो …!!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*दाणे पेरत जातो …!!*

 

माझ्या आतल्या मातीत

मी दाणे पेरत जातो

सवयीच्या मातीत उगवून

अनोळख्या अंधारात निघून जातो

 

माझ्यातही उगवतात वृक्ष

तेही झुडुपांनी घेरले जातात

जे कधीही नव्हते माझ्यांत

ते वृक्ष वाढून संत होतात

 

मुके मौन माझे मला

मातीचं गीत…गायला लावते

निरागस सात्विक अवकाश

आडोसा असूनही..भिजत जाते

 

निर्गुण निर्मोही निराकार

आकाश मातीला कवटाळून घेतं पेरलेले दाणे.. श्वास फुंकुन_ फुंकुन

अंगी फुलत_ फुलत ..गर्भारून जातं

 

विसावलेली निळाई निराकारात

विश्वव्यापी माया पेरत जाते

निर्गुणाची सावली शांत रूपात

निसर्ग देवाच्या चरणी माथा टेकते

 

बाबा ठाकूर धन्यवाद

प्रतिक्रिया व्यक्त करा