सामाजिक कार्यकर्ते गंगाराम कोळेकर यांच्या माध्यमातून साटेली – भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्राला चार लाकडी बाक
दोडामार्ग
साटेली भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रात येणाऱ्या रुग्णांना याठीकाणी मोजकीच बैठक व्यवस्था असल्याने मोठी गैरसोय होते. तासनतास उभे राहावे लागते. अनेक अडचणींना त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना तोंड द्यावे लागते. डॉक्टरांच्या केबिन बाहेर दरवाज्याच्या ठिकाणी घोळका करून उभे राहत असल्याने येथील वैध्यकीय अधिकारी व कर्मचारी यांना नाहक मनस्थाप सहन करावा लागतो.
भव्य दिव्य अशी ही प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत उभी केली मात्र याठीकाणी येणारे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना बसण्याची हवी तशी व्यवस्था नाही. याकडे प्रशासन आणि लोक प्रतिनिधी लक्ष देत नसल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांमधून निव्र नाराजी व्यक्त होत आहे.
सांस्कृतिक लोककला मंच दोडामार्ग चे अध्यक्ष शंकर जाधव, सचिव सागर नाईक, सहसचिव विलास आईर, खजिनदार महेश पारधी यांनी सदर रुग्णालयातील रुग्ण व त्यांच्या नातेवाईक यांची होणारी गैरसोय बघून त्यांनी उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते गंगाराम कोळेकर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सदर बाब त्यांच्या दृष्टीस आणून दिली असता आपण स्वतः या प्राथमिक आरोग्य केंद्राला लाकडी चार बाक देतो असा शब्द दिला. त्यानुसार त्यांनी हे चार बाक जवळ ३५ हजार रुपये किंमतीचे स्वखर्चाने बनवून सोमवार दिनांक २५ नोव्हेंबर २०२४ रोजी गंगाराम कोळेकर यांनी प्रत्यक्ष स्वतः येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश एल.पाटील यांच्या स्वाधीन केले. यावेळी डॉ. बाबासाहेब राणे, कर्मचारी वर्ग तसेच सांस्कृतिक लोककला मंच दोडामार्ग चे अध्यक्ष शंकर जाधव, सचिव सागर नाईक, सहसचिव विलास आईर,सल्लागार प्रकाश वर्णेकर,अमित गाड, दशरथ मयेकर उपस्थित होते.
यावेळी डॉ. पाटील यांनी श्री.कोळेकर यांच्या या सहकार्याबद्दल त्यांना धन्यवाद देत आभार व्यक्त केले. असेच सहकार्य आपणांकडून मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली असता, कोणतेही सामाजिक कार्य असेल तर त्यासाठी माझे निस्वार्थपणे सहकार्य लाभेल असे श्री. गंगाराम कोळेकर यांनी सांगितले.