कणकवली :
भारतीय जनता पक्षाचे कणकवली विधानसभेचे विजयाची हॅट्रिक केलेले नवनिर्वाचित आमदार नितेश राणे यांनी भाजप नेते, मुंबई बँकेचे अध्यक्ष, आमदार प्रवीण दरेकर यांची भेट घेतली. या भेटी वेळी आमदार दरेकर यांनी आमदार नितेश राणे यांनी विक्रमी मताधिक्यासह केलेल्या विजयाच्या हॅट्रिक बद्दल त्यांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देत अभिनंदन केले. यावेळी माजी आमदार शाम सावंत उपस्थित होते.