शिवापूर बीएसएनएल मोबाईल टॉवरची रेंज सुरळीत करा,अन्यथा जनतेचा उद्रेक होईल
*माजी सभापती मोहन सावंत यांनी ग्रामस्थांसह महा प्रबंधक आर.व्ही. जानू यांची घेतली भेट
शिवापूर;
शिवापूर गावातील बीएसएनएलच्या मोबाईल टॉवर ला रेंज नसल्यामुळे गेले कित्येक महिने संपर्कात व्यक्त येत आहे. बीएसएनएलच्या ढिसाळ कारभाराचे उत्तम उदाहरण म्हणून शिवापूर गावचा मोबाईल टॉवर आहे. ही मोबाईल टॉवरची सेवा तातडीने सुरळीत करा. अन्यथा जनतेच्या उद्रेकाला सामोरे जावे लागेल. असा इशारा आज सावंतवाडी येथे कुडाळचे माजी सभापती मोहन सावंत यांनी दिला.
बीएसएनएलच्या सावंतवाडी येथील मुख्य कार्यालयात मोहन सावंत यांच्यासह शिवपूरातील ग्रामस्थांनी जिल्हा महा प्रबंधक आर.व्ही. जानू यांची भेट घेतली. शिवापूर येथील बीएसएनएलच्या मोबाईल टॉवरची सद्यस्थिती समजावून सांगितली. यावेळी मोहन सावंत यांच्या सोबत शांताराम कदम ,अजित कडव ,भागोजी कदम ,रवींद्र गुरव (नेरुर),कौस्तुभ सावंत आदी उपस्थित होते.
शिवापूर येथे बीएसएनएल कंपनीचा मोबाईल टॉवर आहे मात्र त्याची रेंज मोबाईलला भेटत नाही. गेले पंधरा दिवस तर पूर्णतः टॉवरस बंद आहे. कधीतरी सुरू झाल्यास २ जी रेंज पूर्णता बंद पडलेली असते. तर ४ जी रेंज मोबाईल मध्ये दिसत असली तरी संपर्क होत नाही. त्यामुळे स्थानिक जनतेला संपर्कासाठी डोंगरदर्यांवर जाऊन बोलावे लागते. ही वस्तुस्थिती महा प्रबंधक आर.व्ही. जानू यांच्या निदर्शनास आणून दिली. येत्या चार दिवसात शिवापूर मोबाईल टॉवर पूर्ववत करा आणि संपर्काची होणारी गैरसोय दूर करा अन्यथा जनतेचा उद्रेक झाल्यास कोणीही जबाबदार राहणार नाही असा इशारा या शिष्टमंडळाने दिला आहे.