You are currently viewing नाती

नाती

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी संजय धनगव्हाळ लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*नाती*

 

कधीकाळी नाती जपणारी माणसं

आजकाल नात्यांमधे

अंतर ठेवायला लागली

माणसा माणसापासून

दुरावत चालली

 

फक्त स्वतःपुरतं बघायचं

स्वार्थी होऊन वागायचं

हेतू साध्य करून घेण्यासाठी

बोट धरून चालायचं आणि मग

कळू न देता अर्ध्यावरती सोडून द्यायचं

 

नात्यांमध्ये तुझं माझं आलं की

आपसूकच माणसामधे परकेपणा येतो

कितीही जिव्हाळा असला तरी

माणूस अनोळखी सारखा वागतो

 

जेव्हा आपलीच माणसं आपल्यापासून दुरावतात

तेव्हा काळजावर घाव पडतो

मुखवटा उतरल्यावर मग

खरा माणसाचा चेहरा कळतो.

 

खरचं फक्त….

पैशा मागे धावणारी माणसं

पैशासाठी जगत असतात

पैशाचं भूत मानगुटीवर बसलं की

मग वाटा वेगळ्या होतात

 

सध्यातरी असंच चाललंय की…..

नात्यागोत्यातील माणसंच

सोबत राहून जखमा देतात आणि

त्यांनीच दिलेल्या जखमेवर

तेच फुंकर मारतात

 

नाती जपणारी माणसं

आता रहायलीत कुठे

हे जग असंच आहे

काम साध्य झालं की

डोक्यावर मिरवतील

नाहीतर पायदळी तुडवतील

 

*संजय धनगव्हाळ*

*(अर्थात कुसुमाई)*

९५७९११३५४७

९४२२८९२६१८

प्रतिक्रिया व्यक्त करा