You are currently viewing “पुन्हा येईन” म्हणाले होते

“पुन्हा येईन” म्हणाले होते

“पुन्हा येईन” म्हणाले होते….

“पुन्हा येईन” म्हणाले होते
दिला शब्द खरा केला
महाराष्ट्राला लागू पाहणारा
हिरवा रोग बरा केला ll

संजय,शरद,उद्धव,मनोज
काहीच करू शकले नाहीत
प्रतिकूल परिस्थितीतही
देवाभाऊ थकले नाहीत ll

फारसं कधीच बोलले नाहीत
करत राहिले फक्त काम
अविश्रांत मेहेनतीच्याच
पाठी असतात कृष्ण श्रीराम ll

“वो अकेला क्या करेगा”
सारेचजण म्हणत होते
त्यांनी “करून दाखवताच”
सारेचजण ठरले कोते ll

दात घशात गेलेच होते
उरले सुरलेही “सुळे” पडले
त्यांच्या झंझावातासमोर सारेचजण लुळे पडले ll

शिक्कामोर्तब झालं आहे
तेच चाणाक्य असण्यावर
कोणीच रोखू नये त्यांना
मुख्यमंत्रीपदी बसण्यावर ll

*AK ( काव्यानंद ) मराठे*
कुर्धे,पावस,
*संग्रह अजित नाडकर्णी,संवाद मिडीया*

प्रतिक्रिया व्यक्त करा