*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य तथा महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणेचे संस्थापक अध्यक्ष लेखक कवी वि. ग. सातपुते लिखित कवितेचे किरण दिघी यांनी केलेले अप्रतिम रसग्रहण*
*निमिष एकची मजसी पुरे*
**********************
अजुनही , तुझाच चेहरा..
माझिया , बंद लोचनात..
प्रतिबिंब तुझे सोज्ज्वळ..
निर्मळ माझ्या काळजात..
सत्यसाक्षी तूच अनामिक..
हृदयस्थ ! तूच तूं एक प्रीत..
जिथे पहावे , तिथे तूच तूं..
भास , तुझाच गे ब्रह्मांडात..
मी इथे ,तर तू त्या सलीली..
प्रीतगंगा , दुथडी प्रवाहात..
मी डुंबतो सचैल प्रीतडोही..
निरंतर , तुझ्याच आठवात..
निमिष ! एकची मजसी पुरे..
तव दर्शनाचे , या जीवनात..
*रचना क्र. १४९*
*©️वि.ग.सातपुते.(भावकवी )*
*📞 9766544908
*रसग्रहण*
अतिशय चपखल शब्द वापरून मुक्तछंदात कविता लिहिणारे, परंतु त्या मुक्तछंदातील कवितांमध्ये शब्दमाधुर्याने एक प्रकारचा सुंदर नाद सांधणारे श्री वि.ग.सातपुते उर्फ आपले अप्पा यांची *निमिष एकची मजसी पुरे* ही अशीच एक मंत्रमुग्ध करणारी छान कविता!
आपली प्रिय व्यक्ती व माणूस आपण डोळे मिटले तरी क्षणात डोळ्यासमोर येते.तीची प्रतिमा आपल्या काळजात कोरलेली असते आणि कायम खरेपणाची, वास्तवाची अनुभूती देत असते.सर्व चराचरात सदैव तिचाच भास होत असतो.
असे म्हणतात की भूतकाळ हा सदैव दूर दूरच जात असतो. परंतु हृदयात घर करून असलेली प्रेमाची आठवण, ज्या व्यक्तीने आपल्यावर आणि आपण ज्या व्यक्तिवर प्रेम केलेले असते त्या व्यक्तीचे एक क्षणभराचे दर्शन,आठवण देखील आपणास पुढील आयुष्य निरंतर या अथांग जीवन सागरात तरून जाण्यासाठी बळ देते!
खूप सुंदर रचना अप्पा!
👍👌🙏
***********************
किरण जोशी,दिघी,पुणे
***********************