You are currently viewing बाबा आता तरी सुधरा

बाबा आता तरी सुधरा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*बाबा आता तरी सुधरा*

 

खाऊन पिऊन पोट सुटतंय बाबा आहे मस्त

बाबांच्या भरवश्यावर जनता त्रस्त असूनही सुस्त

 

आता तरी दिवस येतील चांगले हो आम्हाला

ते काहीच करत नाही,दिसते सगळे आम्हाला

 

दिवस त्यांचे भरले वाटते

नवीन बाळ येईल जन्माला

 

बाळाला दुध पाजून जनता करीन मोठा

बाळ पळू लागले की होईल बाबाला तोटा

 

बाळ झाले डोईजड बसू लागले डोक्यावर

बाबा खाली सरकू लागले बाळ बसले खुर्चीवर

 

बाबा आता तरी खरे बोला खरे वागायला शिका

नुसती आश्वासनं पोकळ बाता कृती करायला शिका

 

चार गेले एकच राहिले पंचवार्षिक संपायला आले

जनतेच्या अपेक्षेवर तुम्ही तोंडाला पानेच पुसले

 

जनतेने ठरवले बाळ पुढे केले पोट तुमचे ढवळू लागले

खुर्ची गेली मिर्ची लागली तोंड तुमचे पोळू लागले

 

असे काही घडू नये म्हणून बाबा तुम्ही शिस्तबद्ध व्हावे

जनतेला जाग येण्याआधी जोमाने कामाला लागावे

 

भ्रष्टाचार अत्याचार बलात्कार समूळ नष्ट करा

बेकारी बेरोजगारी महागाई यांचीच कास धरा

 

विजयचा हात धरण्याआधी विकास चा विचार करा

नाही तर जनता तुम्हाला करेल पाठमोरा

 

बाबा आता तरी सुधरा….

अहो बाबा आता तरी सुधरा…..

 

कवी:-

*चंद्रशेखर प्रभाकर कासार*

*चांदवडकर, धुळे.*

७५८८३१८५४३.

प्रतिक्रिया व्यक्त करा