You are currently viewing सिरमचे ‘कोविशिल्ड’ व्हॅक्सिन जिल्ह्यात दाखल

सिरमचे ‘कोविशिल्ड’ व्हॅक्सिन जिल्ह्यात दाखल

सिंधुदुर्गनगरी

कोविड प्रतिबंधक लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यासाठी जिल्ह्यात कोरोनाची लस दाखल झाली आहे. कोल्हापूर येथून वरिष्ठ औषध निर्माण अधिकारी संतोष व्हटकर हे आज संध्याकाळी लस घेऊन जिल्ह्यात दाखल झाले.

          शनिवार दिनांक 16 जानेवारी 2021 रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय सिंधुदुर्गनगरी येथे लसीकरणाचा शुभारंभ होणार आहे. या लसीकरण मोहिमेसाठी जिल्ह्याला पहिल्या टप्प्यात  10 हजार 260 डोसेस लस उपलब्ध झाली आहे. यातून साडे चार हजार लाभार्थींना लस देण्यात येणार आहे.

          ही मोहीम जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय, ओरोस, उपजिल्हा रुग्णालय, सावंतवाडी, व उपजिल्हा रुग्णालय, कणकवली या तीन संस्थांमध्ये सुरू होत आहे. या तिन्ही संस्थांमध्ये यापूर्वी नोंदणी केलेल्या आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांना कोविड प्रतिबंधक लस दिली जाणार आहे. शुभारंभाच्या दिवशी या तिन्ही संस्थांमध्ये प्रत्येकी 100 लाभार्थ्यांना लसीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

          सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा आरोग्य विभागाच्या औषध भांडार येथील शितगृहांमध्ये सध्या या लसीची साठवणूक करण्यात आली आहे. लस जिल्ह्यात दाखल झाली त्यावेळी डॉ. संदेश कांबळे, वरिष्ठ औषध निर्माण अधिकारी संतोष व्हटकर यांच्यासह औषध भांडार येथील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. लसीकरणासाठी आवश्यक सर्व साधनसामुग्री, साहित्या याबाबतची पूर्वतयारी संस्थास्तरावर करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा