दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या न्हावेली येथील युवकाचे उपचारांअंती निधन
गोवा बांबोळी येथे सुरू होते उपचार
सावंतवाडी
दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या न्हावेली येथील युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. भूषण उदय पार्सेकर (वय २४) असे त्याचे नाव आहे. हा अपघात १९ नोव्हेंबरला घडला होता. अपघातानंतर त्याच्यावर गोवा-बांबुळी येथे उपचार सुरू होते. मात्र आज सकाळी उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.
याबाबत अधिक माहिती अशी की, भूषण हा नोकरी निमित्त गोवा येथे ये-जा करीत होता. यावेळी १९ नोव्हेंबरला रात्री काम आटपून तो घरी येत होता. दरम्यान न्हावेली येथे आला असता गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला होता. रस्तावर डोके आदळून मोठी दुखापत होऊन रक्तस्राव ही मोठ्या प्रमाणावर झाला असल्याची माहिती स्थानिक नागरिकांच्या वतीने मिळाली आहे. या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यानुसार त्याला गोवा-बांबोळी येथे उपचार सुरू होते. मात्र आज सकाळी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याच्या निधनामुळे न्हावेली गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. भजनी बुवा म्हणून तो परिचित होता.