*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य लेखक कवी अरुण वि. देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*श्रीगोंदवलेकर महाराज काव्यचरितावली*
काव्यपुष्प-१०५ वे
______________________
त्या दिवशीचे ते भजन शेवटचे । आणिक ते निरूपण ।
श्रीमहाराज गेले रंगून । निर्वाणाच्या अभंगात ।। १ ।।
नाम महत्त्व पुन्हा पुन्हा सांगती । जणू कळकळीची असे
त्यांची विनंती । नेत्रातून धारा ओघळती । सांगतांना श्रीमहाराजांच्या ।। २ ।।
ध्यानात ठेवा । नामाचा विसर ना पडावा। मनी राम असावा । सांगणे महाराजांचे सकल जना ।। ३ ।।
निरुपणात अभंग त्यांनी गायला –
शरण शरण रघुनाथा । भक्त पालन करी आता ।।१ ।।
श्रीरामा निरोप द्यावा । देई अखंडित सेवा ।। २ ।।
ब्रीद राखी रघुराज । हेचि सांगतसे गुज ।। ३ ।।
दीनदासाची विनवणी । आज्ञा द्यावी चक्रपाणी ।। ४ ।।
****
हे शब्द श्रीमहाराजांचे । आहेत निरोपाचे । आम्हास सांगायचे । आले कळून सर्वांना ।। ५ । ।
**********
करी क्रमशः हे लेखन कवी अरुणदास
__________________________
कवी अरुणदास – अरुण वि. देशपांडे- पुणे.