*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*मुखवट्यांचे परिधान*
काढून बघा
मुखवट्याचे एकदा परिधान
करावे आत्मभान
जागृत…
अनेकातील एक
का बरे व्हायचे
व्यक्त करायचे
सत्य...
मुखवट्याच्या आड
जरी लपतो चेहरा
दिसतो सारा
मुलामा..
स्वस्त्व जपावे
नको तो मुखवटा
मनात दुखवटा
खोट्याचा…
अंतर्बाह्य निर्मळ
असावे सदा अंत:करण
जगण्याचे कारण
खरे…..
कुणीही कधी
निंदा किंवा वंदा
रूपया बंदा
अस्सलतेचा….!!
°°°•°°°•°°°•°°°•°°°•°°°•°°°•°°°
अरुणा दुद्दलवार @✍️