*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*आज निवडणूक झाली बाई…*
निवडणूक झाली बाई, आज निवडणूक झाली
बाई..
निवडून येतील दादा ताई, निवडून येतील दादा ताई…
दादा ताई निवडतील, आणि शपथा घेतील..
भले माझेच करेन बाई, मला देशाशी घेणे नाही..
आज निवडणूक झाली बाई.. आज …
देवा शपथ सांगते, मी माझ्या कुटुंबाचेच भले
करेन, त्यांच्या सुखासाठी झटेन, सात पिढ्यांची
सोय करेन, स्वीस बॅंका भरेन…माझे कुटुंब हाच
माझा प्राण आहे,…
त्यांना दूर मी लोटणार नाही,आज निवडणूक…
कोण देश? काय देश? मला त्याच्याशी घेणे नाही..या देशात राहून, खाऊन पिऊन, सुविधा लुटून, त्याला शिव्या घालण्यातच माझे समाधान आहे…
माझ्या सारखा गद्दार नाही..
मला त्याचीही लाज नाही…
आज निवडणूक झाली बाई.. आज निवडणूक ..
पाच वर्षांत एवढे कमवेन, एवढे कमवेन..
पुढची निवडणुकही खोक्यावर लढवेन हा माझा
शब्द आहे तुम्हाला…
मी शब्दाचा पक्का बाई, मागे मुळीच फिरणार नाही..
आज निवडणूक झाली बाई..
आज निवडणूक झाली बाई…
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)