You are currently viewing कोकण मराठी साहित्य परिषदेचा गुरुवर्य अ. आ. देसाई कोमसाप कार्यकर्ता पुरस्कार गुरुनाथ ताम्हणकर यांना प्रदान

कोकण मराठी साहित्य परिषदेचा गुरुवर्य अ. आ. देसाई कोमसाप कार्यकर्ता पुरस्कार गुरुनाथ ताम्हणकर यांना प्रदान

मालवण :

कोकण मराठी साहित्य परिषदेचा (२०२२/२३) ‘गुरुवर्य अ. आ. देसाई स्मृती कथामाला कार्यकर्ता पुरस्कार’ गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर, उपाध्यक्ष को.म.सा.प. शाखा मालवण यांना नुकताच मालगुंड रत्नागिरी येथे केंद्रीय अध्यक्षा सौ. नमिता कीर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर को.म.सा.प.चे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, ज्येष्ठ पत्रकार श्री. उदय निरगुडकर, केंद्रीय कार्याध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ, विश्वस्त रमेश कीर, श्री. अरुण नेरुरकर, श्री. सुरेश जोशी उपस्थित होते. शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि रोख २००० रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी वाङमयीन आणि वाङमयेतर अनेक पुरस्कारांचेही वितरण झाले. यावेळी सिंधुदुर्ग मधून केंद्रीय सदस्य श्री. रुजारिओ पिंटो, जिल्हाध्यक्ष श्री. मंगेश मस्के, सौ. उषा परब, श्री. पवार, सौ. तेजल ताम्हणकर उपस्थित होते.

प्रतीवर्षी पालघर पासुन सिंधुदुर्ग पर्यंत कोमसापच्या ७० शाखांमधून आदर्श कोमसाप कार्यकर्त्याची निवड या पुरस्कारासाठी केली जाते. या पुरस्कार निवडीबद्दल सुरेश शामराव ठाकूर, अध्यक्ष कोमसापुर शाखा मालवण यांनी श्री ताम्हणकर यांचे अभिनंदन केले आहे.

गुरुनाथ ताम्हणकर यांनी मालवण शाखेचे उपाध्यक्ष म्हणून काम करताना विविध साहित्यिक व सांस्कृतिक उपक्रमांच्या आयोजनात मोलाची भूमिका बजावली. यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले, “कोमसाप मालवणचे अध्यक्ष श्री. सुरेश ठाकूर यांच्या संकल्पनेतून विविध साहित्यिक उपक्रम राबविले जात. त्या उपक्रमांच्या आयोजन व नियोजनाची जबाबदारी मला मिळाली. त्यामुळे हा पुरस्कार प्राप्त झाला. हा पुरस्कार सर्व कोमसाप मालवण सदस्यांना समर्पित करतो.” या निवडीबद्दल ताम्हणकर यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा