*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी लेखक संजय धनगव्हाळ लिखित अप्रतिम लेख*
*थोडं मनातलं*
******************
काही माणसं खूप रागीट असतात,संतापी असतात,तामसी असतात.काहींचा विचीत्र स्वभाव असतो.काहींच तर त्यांच्या रागावर नियंत्रण नस्ते.छोट्या छोट्या गोष्टींवर भांडणं करतात किंबहुना राग धरतात त्यांच्या रागाला वेळकाळ नसतो कुठेही केंव्हाही रूसून बसायचं शुल्लक कारणावरून वाद निर्माण करायचा.काहींच्या ते अंगवळणी
पडलेल असत.काहीतर उगाच कुरापती काढून कडवटपणा आणता.म्हणजे माणसं इतकी विचित्र स्वभावाची असतात की त्यांना कितीही समजावले तरी पालथ्या घडावर पाणीच असतं काही केल्या समजून घ्यायला तयार नसतात. शिवाय आपल्या वयाच भान ही ठेवत नाही.राग रूसवा काढायलाही एक वयाची मर्यादा असते पण माणसं आपलं वय विसरून तिरसटपणे वागता, कुजकट बोलतांत आपल्यामुळे कुणाच मन दुखेल,वाईट वाटेल,अपमान होईल याचं संबंधित व्यक्तीला भान नसतं.तो बोलून मोकळा होतो,किंवा बिनकामाचं भांडण करतो.कारणनसतांना बरंवाईट बोलतो.ज्या गोष्टींना काहिच अर्थ नसतो अशा निरर्थक गोष्टींना धरुन कुरापती काढण्यात एखाद्याला खूप धन्यता वाटतें.पण ज्या गोष्टीतून काहीच निष्पन्न निघत नाही अशा गोष्टी करण्यात काहीच तथ्य नसतं.आपली शारीरिक उर्जा वाया जाईल अस काम केल्याने त्याचा परिणाम थेट आपल्या मेंदूवर होतो आणि मेंदू वर परिणाम झालेल्याला काय म्हणता हे मी सांगायला नको.तेव्हा कुणाच्या भावना दुखावल्या जाणार नाही असं जर वागलं तर नात्यात दूरावा येत नाही समजदारी,समजूतदारी,समंजसपणाने समजून घेतले तर वादाचा शंक वाजत नाही.चांगल बोलणं व दुसऱ्याला आपलं समजून घेणे हा एकच रामबाण उपाय आहे.आपली नाती दुभंगणार नाही याचा विचार करून माणसाने वागल पाहिजे.आपला माणूस आपल्यापासून दुरावला जायला नको याची काळजी घेऊन जर वागलात ना तर नाती कधीच तुटत नाही.राग रूसवा संताप आचकट पाटकट बोलनं ते क्षणीक असतं तरी कारण नसताना एखाद्याला अपमानास्पद वाटत असेल तर ते काय कामाचं. नात्यात विभागणी झाली तर, आपली एक चुक आयुष्यभरासाठी आपल्या शिक्षे पेक्षा काही कमी नसते.म्हणून बोलताना काळजी घेतली पाहिजे.राग धरून काहीच मिळत नाही बरंवाईट बोलण्यातून काही निष्पन्न निघतं.आपण आपल्या स्वभावात बदल केला तर घर कुटुंब नाते गोते कायमस्वरूपी टिकून रहातात.नात्यात कटूता येत नाही आपसात राग रूसवा रहात नाही.चांगलं बोलल्याने वागण्याने सारं जग जिंकता येते मगं माणसांना का नाही.तेव्हा एखाद्याला आपलसं करण्यासाठी थोडसं गोंड बोललना.तर माणसं कायम आपल्या सोबतीलाच रहातात.कारण आपल्या वागण्यातून माणूस कळतो.कोण केव्हा उपयोगी पडेल काही सांगत येत नाही.शिवाय सध्या धावपळीच्या युगात कधी कधी आपले सख्खे जवळ नसतात अशावेळी शेजारीपाजारी मदतीला धावून येण्याची शक्यता नाकारता येतं नाही.म्हणून माणसाची दिनचर्या हि त्याच्या वागण्यावर असते.तुम्ही जर चांगले वागाल तर सगळे तुम्हाला उचलून धरतीलं चुकीचे वागलात तर कधी उचलून फेकतील कळणारही नाही.तेव्हा चांगलं वागणं बोलणं सुस्वभावी असणं सर्वांना आपलसं करून घेणं हेच सुरेख सुंदर जगण्याचा गुरू मंत्र आहे असं मला वाटतं काय…….
*संजय धनगव्हाळ*
*(अर्थात कुसुमाई)*
९४२२८९२६१८
९५७९११३५४७