कणकवली :
उबाठा शिवसेना व महाविकास आघाडीचे कणकवली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार संदेश पारकर यांनी कणकवली शहरातील जि. प. प्राथमिक केंद्र शाळा क्रमांक १ येथे कुटुंबीयांसह मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्यासमवेत पत्नी सौ. समृद्धी, मुलगा सौरभ, मुलगी गंधर्वी आदी उपस्थित होते. मतदारांमध्ये फार मोठा उत्साह असून मशाल चिन्हाला भरभरून मतदान होईल व कणकवली मतदारसंघात परिवर्तन घडेल, असा विश्वास पारकर यांनी व्यक्त केला.