*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम लेख*
*मैत्रीचे नाते जपावे*
मैत्रीचे नाते जपावे म्हणतात पण
आपण फक्त व्हाट्सऍप ने मित्र म्हणून जवळ आहोत हे मान्य केले पाहिजे. ह्या गृप वर सात आठ मित्र आणि मी स्वतः नियमित पोस्ट करतो, तर काही आठ दहा मित्र कधीकधी एखादी पोस्ट करतात. कोणाचा वाढदिवस, विवाह वाढदिवस असला की हार्दीक शुभेच्छांचा त्या दिवसा पुरता पाऊस पडतो गृप वर, काही तर गुडमॉर्निंग गुड नाईटचे मेसेज टाकून मित्र अस्तित्वाचा दाखला देऊन विषय संपवतात.
हे सगळे मनाने जवळ आहे की रिकामेच आहेत म्हणून पोस्ट करतात काय माहीत?
पण आपण अजूनही मित्र म्हणून जवळ आलेलो नाही असे वाटते. प्रत्येकाच्या समस्या आहे हे आपण समजू शकतो. आपल्यातले आपलेच चार मित्र आपल्याला कायमचे सोडून गेले.
कोणी कुटुंबासह
विदेशात जात आहे, कोणाची मुले विदेशात नोकरी निमित्त वास्तव्यास आहेत. पण ते धुळे नाशिक पुणे मुंबई येथे आपले जीवन मजेत जगत आहेत. प्रत्येकाला वाटते एकदा तरी मित्रांना भेटावे. मग कोणीतरी पुढाकार घेऊन एकदा तरी असे गेट टुगेदर करायलाच हवे. मीच घेणार होतो पण मला आर्थिक समस्यांनी थोपवले आहे. कदाचीत पुढच्या वर्षी माझे पुस्तक प्रकाशित होईल त्यावेळी मी नक्की सर्वांना बोलवून घेईल तोपर्यंत कोणी व्हालंटरी रिटायरमेंटला मित्रांना बोलावून घेतले तर ते ही एक प्रकारचे गेट टुगेदर होईल.
मी धुळेतच राहतो कधी कधी कंटाळा आला की हल्ली पुण्यात आठ दहा दिवस जाऊन येतो. लॉकडाऊन संपला आणि माझा व्यवसाय बंद करून मी व्यावसायिक रिटायरमेंट घेतली. त्यातच माझ्या पेक्षा मोठा भाऊ माझ्याशी बोलून घरी जात असताना त्याची बाईक स्लीप झाली आणि तोही सोडून गेला. अडीच वर्षांपूर्वी. खूप वाईट दिवसातही काव्य लिखाणाने जगण्याचा आधार दिला. त्या परिस्थितीत माझ्या मोठ्या मुलीने जबाबदारीने घराची धुरा सांभाळली. कोणा पुढे हात पसरवायची वेळ नाही येऊ दिली. आज तिची स्वतः ची टुरिझम कंपनी आहे.
दिवाळी ला मित्र एकमेकांशी बोलतात भेटायला येतात.
तसा बाळू नेहमीच भेटत असतो. नाना धुळेला आला की भेटल्या शिवाय जात नाही. बंडू तर अगोदरच फोन करून सांगतो मी येत आहे म्हणून
एक तात्या होता ज्याची कुठेही केंव्हाही भेट व्हायची जो सर्वांना भेटणारा एकमेव मित्र होता तो ही गेला सोडून. याव्यतिरिक्त दोन तीन मैत्रिणी ज्या गावातच राहतात भेटल्या की कसा आहेस म्हणून विचार पूस होते.
बरेचदा असे होते की मित्रांना गावात दिसल्या बरोबर आवाज देऊन थांबण्यासाठी हाक मारली तरी ते न बघितल्या सारखे करून जवळून निघून जातात. काही थांबतात पण काम आहे नंतर भेटू बोलू असे सांगून पळ काढतात. काहीतर दुरूनच बघून वळण घेतात. बरेच मित्र बाहेरगावी राहतात धुळेला येतात पण मित्रांना भेटावे असे त्यांना कधीच वाटत नाही. जिथे गावात राहणारे भेटत नाही तिथे बाहेर राहणाऱ्यांकडून काय अपेक्षा करायची म्हणा.
खरे तर आता मला मित्रांची कमतरता नाहीच खूप कवी मित्रांचा गोतावळा गावात आणि प्रत्येक गावात जमवून ठेवलाय. पुण्यातही चार साहित्यिक मित्रांना भेटून आलो.
पण पुण्यातील वर्गमित्रांना वेळ मिळत नाही भेटायला. कधीकधी असे वाटते की ते सर्व माझे मित्र आहेत पण मी त्यांचा मित्र नाहीच म्हणूनच ते भेटायचे बोलायचे टाळतात, कदाचित असेही असेल की त्यांना नवीन मित्र भेटल्यामुळे आता ते मला विसरले असावे किंवा संसाराच्या रहाटगाड्यात इतके व्यस्त झाले आहेत की त्यापलिकडच्या विश्वात ते जाऊच शकत नाही.
जेंव्हा जेंव्हा मी वय झालेले म्हातारे झालेली माणसे कुठे चौकात, ओसरीवर, बागेत, नदीकाठच्या जवळ घोळका करून मजाक मस्ती मैत्रीचा आनंद घेतांना एकत्र येऊन चहा वगैरे पितांना पहातो तेंव्हा मला त्यांचे कौतुक वाटते आणि हेवाही वाटतो की माझे मित्र असे का विखुरलेले दूर गेले. जीवनाच्या मध्यावरून असे पुढे सरकत चाललो असताना मैत्री घट्ट व्हावी की तिची, विण विरळ होत जावून संपावी ह्या जाणीवेनेच मन विचलीत होते.
मैत्री चे नाते जपावे म्हणतात.
पण मित्रांना टाळावे याचा अनुभव याची देही घेतांना वाटते आपण खरोखर मित्र आहोत का? तुम्ही माझे मित्र आहात पण मी तुमचा मित्र आहे की नाही अशी शंका मनात निर्माण व्हायला लागली आहे. कदाचित कधीतरी कुठेतरी दिसलो आणि तुम्ही मला आवाज दिला तर मी थांबेल तुमच्या साठी एक मैत्रीची भेट म्हणून…
तुमचाच मित्र
🙏
कवी:-
*चंद्रशेखर प्रभाकर कासार*
*चांदवडकर, धुळे.*
७५८८३१८५४३.