You are currently viewing गृहमतदानात जिल्ह्यात 2 हजार 370 पैकी 2 हजार 273 मतदान

गृहमतदानात जिल्ह्यात 2 हजार 370 पैकी 2 हजार 273 मतदान

गृहमतदानात जिल्ह्यात 2 हजार 370 पैकी 2 हजार 273 मतदान

सिंधुदुर्गनगरी

विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावे, यासाठी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय यंत्रणेने नियोजन केले आहे. भारत निवडणूक आयोगाने 85 वर्षांपुढील व दिव्यांग मतदार जे मतदान केंद्रापर्यंत जाऊ शकणार नाहीत त्यांच्यासाठी गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करुन दिली. जिल्ह्यात दि 15 ते 17 नोव्हेंबर दरम्यान गृहमतदानाची प्रक्रीया पार पडली. त्यामध्ये जिल्ह्यात 2 हजार 370 पैकी 2 हजार 273 मतदारांनी गृहमतदान केले.

 विधानसभा संघनिहाय गृह मतदारांची संख्या व  कंसात एकूण मतदान पुढीलप्रमाणे आहे.

268- कणकवली-  1 हजार 116 पैकी 1 हजार 055 , (अपंग- 158, 85 वर्षांपुढील – 897)

269- कुडाळ- 638 पैकी 612 (अपंग- 60, 85 वर्षांपुढील – 552)

270- सावंतवाडी- 616 पैकी 606 (अपंग- 91, 85 वर्षांपुढील – 515)  मतदारांनी मतदान केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा