कुडाळ :
कुडाळ मालवण मतदार संघात माजी खासदार निलेश राणे हे उच्च शिक्षित व्यक्तिमत्व महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवीत आहेत. त्यांच्या पाठीशी आर .पी .आय. (आठवले) पक्षाची संपूर्ण ताकत उभी आहे. आर .पी.आय .ची मते निर्णायक असून त्यांच्या विजयासाठी महत्वपूर्ण ठरणार असून त्यांच्या मताधिक्यामध्ये वाढ करण्याची भूमिका आर. पी. आय. (आठवले) पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सहसचिव रमाकांत जाधव व जिल्हा अध्यक्ष अजितकुमार कदम यांनी आज मांडली. त्यांच्या समवेत जिल्हा सरचिटणीस प्रकाश कांबळे, कार्याध्यक्ष सखाराम कदम, खजिनदार आनंद पेंडूरकर, कुडाळ तालुकाध्यक्ष सतीश कदम हे उपस्थित होते.
महायुतीमध्ये भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (अजीत पवार) आणि आर. पी. आय. (आठवले) हीच महायुती पुन्हा विधानसभेवर सत्तेत येणार यामध्ये कोणत्याही प्रकारचे दुमत नाही.
रिपब्लिकन जनता ही सुज्ञ आहे. ती कोणाच्याही अपप्रचाराला बळी पडणार नाही. जर आपला विकास साधायचा असेल तर महायुतीच्या माध्यमातून त्याच्या उमेदवाराला निवडून देणे आवश्यक आहे. आर .पी. आय. चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या नेतृत्वा खाली रिपब्लिकन पक्षाला मानणारा मोठा वर्ग आहे. कुडाळ मालवण मतदार संघातील तडफदार व्यक्तिमत्व निलेश राणे यांनी यापूर्वी लोकसभेमध्ये प्रतिनिधीत्व केले आहे. त्यामुळे देशाच्या संसदीय कामकाजाचा अनुभव आहे. त्यांना जनतेच्या प्रश्नाची जाण आहे. त्यामुळे विधानसभेमध्ये आपला ठसा उमटवतील असा आशावाद सर्व आंबेडकरी जनतेमध्ये असल्या कारणाने निलेश राणे यांना प्रचंड मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन या पत्रिकाद्वारे करण्यात येत आहे.
तसेच कणकवली मतदार संघांचे लोकप्रिय उमेदवार आमदार नितेश राणे हे कार्यक्षम आणि विकासात्मक असलेले नेतृत्व तसेच सावंतवाडी मतदार संघाचे उमेदवार राज्याचे शालेय शिक्षण मंत्री ना. दिपकभाई केसरकर आणि कुडाळचे भावी आमदार निलेश राणे या तीनही उमेदवारांना निवडून देण्याची गरज या घडीला आहे. त्यांच्या माध्यमातून आजवर झालेला विकास या जिल्ह्याने पाहिला आहे. त्यासाठी महायुतीचे हे तीनही उमेदवार जिल्ह्याच्या सर्वांगीण भवितव्यासाठी विधानसभेवर निवडून येणे काळाची गरज आहे.