*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*कुशीत कोण बरं रडलं…!*
गर्भरेशमी नाजूक फुलांवर
ममतेचे थेंब कसले
तयांच्या मुग्ध कुशीत
कोण बरं रडले…
दाटून आले मज
फुलांशी हितगुज केली
माझं अवकाश नेसून
आई आकाशी गेली..!
टिपून टिपून डोळे
थेंबात सुर्यकिरण भिजले
पाहिले तिने जाताजाता
डोळे पदराने पुसले..!
फुले ह्दयांत रूसली
रोजचचं आपलं नातं
धरा उजळली आकाशी
मातृत्व उजळून येतं..!
फुलांचा अश्रूथेंबाचा बहर
अनंत फुलांच्या शय्येवर
आकाशगंगेत दर्शन तिचं
प्रेमस्वरूप शांत मनोहर…!!!
बाबा ठाकूर धन्यवाद